job.jpg 
नाशिक

कोरोना रोजगारसंधी गिळंकृत तर करणार नाही?...तरुणाईत भीतीचे सावट!

गायत्री जेऊघाले : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जगभरात कोरोनाचा थैमान सुरू आहे. एकीकडे कोरोना विषाणूशी लढा सुरू असताना, तरुणाईला बेरोजगारीच्या भीतीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सर्वच क्षेत्रांतील युवकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यातच वेतनकपातीमुळे आर्थिक नियोजन बिघडल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

युवांना संकटाची झळ

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायावर परिणाम झालेला आहे. जागतिक मंदीमुळे आधीच बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर असताना, आता हे संकट आणखी गडद झालेले आहे. विशेषतः आयटी व सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून खर्च कपातीचा भाग म्हणून मनुष्यबळ कमी करण्यावर भर दिला जात आहे. देशाचे बलस्थान असलेल्या युवांना या संकटाची झळ बसायला लागली आहे. 

देशात बेरोजगारीचा दर 24 वर 

सेंटर फॉर मोनिटरिंग इकॉनॉमीने (सीएमआयई)मार्फत बेरोजगारी संदर्भात आकडेवारी जारी झाली आहे. त्यानुसार 22 मार्चला देशात बेरोजगारीचा दर 8.4 इतका होता. एका आठवड्यातच 29 मार्चला हा दर 23.8 वर पोचला. 10 मे व नंतर 17 मेस हा दर 24 वर पोचला आहे. 

सध्या कंपनीने "वर्क फ्रॉम होम' दिले आहे. ऑफिसच्या तुलनेत काम अधिक दिले जाते. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे अनेक आर्थिक समस्या येत आहेत. - निवेदिता वाटपाडे 

लग्न होऊन एक वर्ष झाले आहे. आम्ही दोघे नोकरी करत असल्याने आर्थिक चणचण भासली नाही. मात्र आता लॉकडाउनमुळे गृह व वाहन कर्जाचे हप्ते भरण्यात अडचणी येत आहे. भविष्याची चिंता आता सतावत आहे. - अश्‍विनी जाधव 

कंपनीतून अनेक सहकाऱ्यांना काढण्यात आले आहे. त्यामुळे कळत-नकळत कामाचा व्याप वाढला आहे. घर आणि कार्यालय असे दोन्ही सांभाळणे अधिक अवघड झाले आहे. - मयूर गायकवाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT