Nashik News  esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज | आवड जोपासताना सत्त्वाची ओळख

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जीवनात सकारात्‍मक ऊर्जा असणे गरजेचे आहे. आवड जोपासताना तसेच स्वतः अंतर्मुख होऊन आपल्‍यातील सत्त्वाची ओळख पटली. हे सारे शक्‍य झाले केवळ मंत्रोच्चारातून, असे वासंती कुलकर्णी यांनी आपल्या पौरोहित्‍याच्या प्रवासाचे वर्णन ‘सकाळ’शी संवाद साधताना केले. (Latest Marathi News)

वासंती कुलकर्णी यांचे माहेर नागपूरचे, वडील शरीरशास्‍त्रातील एम. एस. आणि संस्‍कृत या विषयाचे अगाध ज्ञान यामुळे त्‍यांना लहानपणापासूनच संस्‍कृत विषयात गोडी निर्माण झाली. वडिलांकडून त्यांनी प्राथमिक मंत्रपठण शिकून घेतले. सासर नाशिकचे, त्‍यांना लहानपणापासूनच नाशिकबद्द‌ल कुतूहल होते. लग्‍नानंतर पतीच्या नोकरीनिमित्त नाशिक रोड येथे त्‍या स्थायिक झाल्‍या. संस्‍कृत चांगले असल्‍याने आणि वडिलांची लहानपणापासूनची शिकवण यामुळे त्या गीतेत पारंगत होत्‍या. तसेच त्‍यांच्या घराच्याजवळच विनया जोशी आणि श्रीमती परांजपे पौरोहित्याचे वर्ग घेतात. हे कळल्‍यावर त्‍यांनी २००६ मध्ये वर्गात प्रवेश घेतला. पाच वर्षांचे शिक्षण पूर्ण करत पुढे वेदोक्‍त शिक्षणासाठी त्‍यांनी श्रीमती दुगल यांच्याकडे शिक्षण घेतले. तसेच त्‍यांनी बी.ए.च्या शिक्षणात संस्‍कृत आणि संगीत या विषयात चांगले गुण प्राप्त केले.

संगीतामुळे मंत्रोच्चार, लय, सूर, तालबद्धता या गोष्‍टी सोप्या झाल्‍या. त्‍यामुळे अधिक गोडी निर्माण होत गेली, तसेच श्रीमती दुगल व साने गुरुजी यांचा या सगळ्यात सिंहाचा वाटा आहे, असे त्‍या म्‍हणाल्‍या. लहान मुलाचे संस्‍कारवर्ग तसेच महिलांसाठी गीतेचे वर्ग त्‍या घेतात. पौरोहित्‍य करतानाचे अनुभव सांगताना त्‍या म्‍हणाल्या, की पीडेने व्यापलेल्या एक गृहस्थांसाठी सौरसूक्ताचे नित्‍यपठण करत असताना त्‍यांच्या तब्‍येतीत सुधारणा झाली. यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. मिळणाऱ्या मानसिक समाधानामुळे मन प्रसन्न होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT