Female Priest Vaishali Pathak Latest marathi news
Female Priest Vaishali Pathak Latest marathi news esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज : स्‍त्री पौरोहित्‍याची पध्दत वैदिक काळापासून

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अमृत महोत्‍सवात पदार्पण करणाऱ्या वैशाली पाठक यांचा उत्‍साह दांडगा आणि प्रसन्न मुद्रा. हे केवळ शक्‍य झाले ते पौराहित्‍य शिकून मंत्रोच्चाराच्या स्‍पंदनाने. ‘सकाळ’शी संवाद साधताना पौराहित्‍याची पार्श्वभूमी व प्रवास याविषयी जाणून घेतले. (Female Rule in Priesthood vaishali pathak nashik Latest marathi news)

स्‍त्री पौरोहित्‍याची पध्दत वैदिक काळापासून होती, पुढे ती लुप्त झाली. वेदकाळात विश्‍वावरा नावाची स्‍त्री यज्ञाचे पौरोहित्‍य करत असे. आधुनिक काळाचा विचार करता साईबाबांच्या काळातील शिर्डीजवळ साकोरी गावातील उपासनी महाराज यांनी स्‍त्री पौरोहित्‍य ही संकल्‍पना समाजात रूढ केली.

स्‍त्रियांना पौरोहित्‍य शिकवले आणि त्‍यांना पौरोहित्‍य करण्याचा अधिकार दिला. नंतर पुण्यातील थत्ते गुरुजींनी १९६० मध्ये स्‍त्रियांना पौरोहित्‍य शिकवले नंतर १९६२ मध्ये पुण्यात विनायक पेंडसे व सहकारी यांनी ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. १९७२ पासून ज्ञान प्रबोधिनीने स्त्री पौरोहित्याच्या कार्यास प्रारंभ केला.

राणी भवन येथे चालणाऱ्या पौरोहित्य विभागाच्या प्रमुख वैशाली पाठक मूळ नागपूरच्या व सासर नंदूरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाशा येथील. त्यांचे वडील संघाचे खंदे कार्यकर्ते होते. लहानपणीच पितृछत्र हरवले.

त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय खडतर गेले. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खो- खो खेळलेल्या वैशाली पाठक यांनी सायकॉलॉजी विषयात बी. ए. केले. मुळातच कलाकार असलेल्या त्या ग्लास पेंटींग छान करत.

मुलांच्या शिकवण्या घेणे, क्राफ्टचे वर्ग घेणे अशा तऱ्हेने त्या स्वत:ला सतत कार्यरत ठेवायच्या. नाशिक येथे आल्यावर पौरोहित्‍य वर्गात १९८९ मध्ये प्रवेश घेतला. गुरू वीणा मोडक यांच्याकडे त्या पौरोहित्य शिकल्या. अनंतशास्त्री दातार, साने गुरुजी, पौर्णिमा मंडलिक यांचेदेखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

नाशिकच्या पुरोहित संघाने त्यांची परीक्षा घेतली होती व त्या परीक्षेत पहिल्या ३ स्त्री पुरोहिता झाल्या, त्यामधील वैशाली पाठक या एक. गेली जवळपास ३० वर्षे राणी भवन येथे चालणाऱ्या पौरोहित्य विभागाच्या त्या प्रमुख आहेत. १९९२ पासून वर्ग घेत महिला पुरोहिता व शिक्षिका तयार केल्या आहेत. त्‍यांनी २० वर्षे संस्कारवर्ग घेतले आहेत. त्यांनी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन संस्कार वर्गही घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT