नाशिक

नाशिक : सासरच्या जाचाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या

अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : मरळगोई (खु.) ता निफाड येथील महिला सरपंचाने राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २२) रात्री घडली. मरळगोई खुर्द ग्रामपंचायतच्या विद्यमान महिला सरपंच योगीता अनिल फापाळे यांनी मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी रात्री साडे आठच्या दरम्यान विषारी औषध सेवन केले. त्यांचे पती अनिल फापाळे यांनी उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉ खुशाल जाधव यांनी तपासणी दरम्यान सदर महिलेस मृत घोषित केले.

मयत योगिता चा भाऊ संतोष शांताराम गवळी रा. मकरंदपूर ता.कन्नड (औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच झाल्या पासून माझी बहिणीस कोणत्याही कारणावरून व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होते योगिता ने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरुण पती अनिल बाबासाहेब फापाळे,सासरे बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दिर प्रदीप फापाळे सर्व राहणार मरळगोइ (खुर्द) यां चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात भादवी ३०६, २३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT