NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News : मनपा प्रशासनाधिकारी पदासाठी फिल्डींग!

सकाळ वृत्तसेवा

NMC News : लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना निलंबित करण्यात आल्याने त्यांच्या जागी प्रभारी शिक्षणाधिकारी पदी डॉ. मिता चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.

परंतु त्यांच्याकडे आधीचं चार विभागांचा कार्यभार असल्याचे निमित्त करून त्यांच्या जागेवर जिल्हा परिषदेच्या अधिक्षक पदावरील व्यक्तीकडे प्रशासनाधिकारी पदाचा कार्यभार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Fielding for post of NMC education department Administrative Officer News)

सुनीता धनगर व लिपिक नितीन जोशी या दोघांना प्रत्येकी पन्नास हजार व पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ४८ तास तुरुंगात राहिल्याने धनगर यांना निलंबित करून त्यांना महापालिका मुख्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले.

पंचायत समितीच्या डॉ. मिता चौधरी यांच्याकडे प्रशासनाधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. पदभार स्वीकारून जेमतेम आठ ते दहा दिवस झाले. या कालावधीत डॉ. चौधरी यांच्याकडून शिक्षण विभाग व शाळांची विस्कटलेली घडी सुरळीत झाले असताना त्यांच्याकडील प्रभारी पदभार काढून घेण्यासाठी फिल्डींग लावली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिक्षकांचे नाव प्रभारी शिक्षणाधिकारी पदासाठी सुचविण्यात आल्याचे बोलले जात आहे. सीबीएस येथील शासकीय कन्या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा कार्यभारदेखील डॉ. चौधरी यांच्याकडे आहे.

राज्यभरात नावाजलेल्या या शाळेच्या कामकाजाची घडी डॉ. चौधरी यांनी व्यवस्थित केली आहे. या शाळेकडे अधिक लक्ष देण्यासाठीच त्यांच्याकडील महापालिकेचा कार्यभार कमी करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे, तर डॉ. चौधरी यांनीदेखील महापालिकेचा कार्यभार कमी करण्याची विनंती शासनाला केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT