CM Eknath Shinde esakal
नाशिक

Shinde Group News : नाशिक मध्ये शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

सकाळ वृत्तसेवा

Shinde Group News : शिवसेना शिंदे गटाच्या नाशिक महिला कार्यकारिणीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शनिवारी (ता. १०) शिंदे गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाला.

मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्येच हा राडा झाल्याने नाशिक मधील शिवसेनेच्या शिंदे गटात कार्यकारिणीतील खदखद समोर आली आहे. (fight among women office bearers of shivsena Shinde Group in mumbai naka police station at Nashik political news)

नाशिक शिवसेना शिंदे गटातील महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर यांच्यामध्ये शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या समोरच पक्षातील पदांच्या नियुक्तीवरून शाब्दिक चकमक झाली होती.

याच बाबत लक्ष्मी ताठे या शोभा मगर यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या होत्या, मात्र याचवेळी शोभा मगर यांचे चिरंजीव धीरज मगर आणि त्यांचे अन्य काही समर्थकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जात राडा घातला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान याप्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मी ताठे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. तर शोभा मगर यांनी हे सर्व आरोप धुडकावून लावले आहे.

एका बाजूला भाऊसाहेब चौधरी शिवसेना शिंदे गटाच्या संघटन मजबुतीसाठी काम करत असताना अशा पद्धतीने पक्षाअंतर्गत वाद होणे आणि थेट पोलीस ठाण्यामध्ये हमरी तुमरी पर्यंत हे प्रकरण जाणे ही नक्कीच शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन वाढवणारे ठरणार असल्याचे समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT