NMC Fight with coronavirus esakal
नाशिक

Fight with Coronavirus : कोविडचा सामना करण्यासाठी NMC सज्ज; पुन्हा पूर्वीसारखीच तत्परता!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात कोविडसह ‘एच ३ एन १’ इन्फ्लुएन्झाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सज्जता ठेवली आहे. कोविडचे सद्यःस्थितीत ६७ रुग्ण असून, त्यातील एक रुग्ण उपचार घेत आहे. तर, उर्वरित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. इन्फ्लुएन्झाचा सोमवारी (ता. २७) पुन्हा एक रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या नऊ झाली आहे.

आरोग्य संचालकांनी कोविडसह इन्फ्लुएन्झाचा आढावा घेतला. राज्यात पुणे, मुंबई व ठाणे अशी क्रमवारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी तपासणी वाढविण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, नाशिक महापालिका हद्दीमध्ये मार्च महिन्यापासून कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सज्जता ठेवली आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

कोविड रुग्णांची मार्चमध्ये वाढ

दोन मार्चला कोविडचे दोन रुग्ण आढळले. त्यानंतर लागोपाठ दुसऱ्या दिवशी एक रुग्ण आढळला. ६ मार्चला तीन, तर ८ मार्चला चार कोविड रुग्ण आढळले. १३ व १४ मार्चला प्रत्येकी सहा रुग्ण आढळले.

१५ मार्चला एक तर, १६ मार्चला तीन, १७ मार्चला सहा, २० मार्चला सर्वाधिक १२ रुग्ण आढळले. २१ मार्चला एक, २३ मार्चला ११, तर २४ मार्चला सात कोविड रुग्ण आढळले.

मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था

- डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय- ७ क्युबिक मीटरचे ४५ तर २३० लीटर्सचे तीन टँक आहे.
-बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात- ७ क्युबिक मीटरचे १० तर १९ किलोलीटर्सचे ४ टँक आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

टेस्टिंग व्यवस्था

- आरटीपीसीआर- ३ हजार किट शिल्लक.
- रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट- १,८०,००० शिल्लक.
-व्हायरल ट्रान्स्फर मीडिया किट- ४२०० शिल्लक.

साथ रोगाच्या अनुषंगाने तयारी

रुग्णालय एकूण बेड आयसीयू ऑक्सिजन बेड व्हेंन्टिलेटर
झाकिर हुसेन १५० ५० १०० ४६
बाळासाहेब ठाकरे रुग्णालय ६५० १२० ५३० ११९
मायको सातपूर ५० ०० ५० ००
छ. संभाजी स्टेडिअम २०० ०० १८० ००
---------------------------------------------------------------------------------------
एकूण १०५० १७० ८६० १६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT