Swasthyam 2022 esakal
नाशिक

SAKAL Swasthyam: मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा; ‘स्वास्थ्यम‌’तर्फे 19 ला परिसंवाद व योगमुद्रा कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Swasthyam : मधुमेह समज आणि गैरसमज, मधुमेह कसा टाळता येईल, आहार व स्थूलपणाचा मधुमेहाशी संबंध या संदर्भातील सर्व प्रश्‍नांची उत्तर मिळणार आहेत ती सकाळ ‘स्वास्थ्यम’ संघाच्या वतीने शनिवारी (ता.१९) रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ ते ८ च्यादरम्यान होणाऱ्या ‘मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा!’ या परिसंवाद व योगमुद्रा कार्यशाळेत. प्रवेश विनामूल्य आहे. (fight with diabetes 19th Symposium and Yoga Mudra Workshop by Sakal Swasthyam nashik)

मधुमेह (डायबेटिस मेलिटस) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही (टाइप वन); किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही (टाइप टू).

या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्र विसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात.

रक्तातील साखर वाढू लागते तेव्हा शरीर काही संकेत देते. यात जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा येणे, दृष्टी कमकुवत होणे आणि वजन कमी होणे अशा काही लक्षणांचा समावेश असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याशिवाय रक्तातील अनियंत्रित साखरेमुळे शरीरातील लहान रक्तवाहिन्यांनाही हानी पोचते आणि अवयवांना रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. हे आपणास माहीत असते.

मात्र हा शरीरात अस्वस्था निर्माण करणाऱ्या मधुमेहासंदर्भातील समज आणि गैरसमज, मधुमेह कसा टाळता येईल, आहार व स्थूलपणाचा मधुमेहाशी काय संबंध या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी सकाळ स्वास्थ्यम‌ संघाच्या वतीने परिसंवाद व योगमुद्रा कार्यशाळा होत आहे.

यात मुधेमहतज्ज्ञ, ऊर्जा उपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, ओबेसिटी व मधुमेहतज्ज्ञ आदी सहभागी होणार आहेत. प्रवेश विनामूल्य असून, सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्‍यक आहे.

फोन बुकिंगसाठी २४०-२४७६२६१, २, ३ यावर संपर्क साधावा. या परिसंवादाचे हेल्थ पार्टनर शारंगधर, ऊर्जा पार्टनर निरामय वेलनेस सेंटर आहे. क्यूरकोड स्कॅन करा अन्‌ सहभागी व्हावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT