crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : ‘लतिका’कडे सापडले 11 तोळे सोने; आर्थिक गुन्हेशाखेने घेतली घरझडती

बिनव्याजी कर्जाचे आमीष दाखवून गोरगरिबांची आर्थिक फसवणुकीचा भांडाफोड झाल्याने आत्तापर्यंत ५०० पेक्षा अधिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : एक हजार ते १२ हजार रुपयांची गुंतवणूकीवर दोन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्जाचे आमीष दाखवून गोरगरिबांची आर्थिक फसवणुकीचा भांडाफोड झाल्याने आत्तापर्यंत ५०० पेक्षा अधिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणाची मुख्य सूत्रधार लतिका खालकार उर्फ लावण्या पटेल हिच्या घरझडतीत ११ तोळे सोने आर्थिक गुन्हेशाखेने जप्त केले आहे. (Financial fraud of poor by showing lure of interest free loans nashik crime news)

दरम्यान, याप्रकरणात संशयित लतिका हिच्या पोलीस कोठडीत येत्या सोमवारपर्यंत (ता. ८) वाढ केली आहे तर, उर्वरित पाच संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याने त्यांना नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.

इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गेल्या ३१ डिसेबर रोजी पाथर्डी फाटा परिसरातील बालाजी फायनान्सशिअल सर्व्हिसेस या कंपनीविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने मुख्य संशयित लतिका खालकर उर्फ लावण्या पटेल, नवनाथ खालकर, सुगर औटे, विनोद जिनवाल उर्फ विकी, मोईनअली सय्यद, उत्तम जाधव यांना अटक केली होती.

यात लतिका खालकर ही मुख्य सूत्रधार असून, तिनेच बनावट कागदपत्रांच्या आधारे सदरचा फ्रॉड केल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिच्या पोलीस कोठडीमध्ये येत्या सोमवारी (ता.८) पर्यंत वाढ केली आहे. तर उर्वरित पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान शहर आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने लतिका हिच्या सिडकोतील घराची झडती घेतली असता, त्यावेळी महत्त्वाच्या कागदपत्रांसह सात लाखांचे ११ तोळे सोने जप्त केले आहे. पोलीस तपासातही तिच्या चौकशीत सातत्याने विसंगती आढळून आली आहे. तसेच, या सार्या प्रकरणात तीच मुख्यसूत्रधार असल्याचेही समोर आले आहे.

तर, संशयित कृष्णाराव रेड्डी, माधवन कृष्णन, श्रीनिवासन, शफिक शेख, जयश्री गांगुर्डे, भाग्यश्री लिलके, तेजस्वीनी अंभोरे, लता हिरे, शिला, अलका लोंवय, परशुराम गावित, अशोक निकम, सलीम खान यासह वीस जणांचा पोलीस शोध घेत आहेत. आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, संजय पिसे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT