NMC esakal
नाशिक

NMC News : मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलासाठी आर्थिक तरतूद

विधानसभेत तारांकित प्रश्नावर नगर विकासचे उत्तर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल येथे उड्डाणपूल रद्द झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पूर्ण रद्द झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात विधानसभेमध्ये माजी पालकमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर नगर विकास विभागाने लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे किमान कागदोपत्री उड्डाणपुलाचा वाद जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Financial provision for Mico Circle Trimurti Chowk flyover Answered by Nagar Vikas on question in Assembly NMC News)

२०२०- २२ च्या अंदाजपत्रकामध्ये सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते उंटवाडी दरम्यान एक उड्डाणपूल व मायको सर्कल येथे दुसरा उड्डाणपूल तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूददेखील करण्यात आली, मात्र मुलाच्या कामाला सुरवात होण्याअगोदरच वादाचे मोठे मोहोळ उठले.

सुरवातीला वाहतूक सर्वेक्षण नसतानाच उड्डाणपूल तयार करण्याची घोषणा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर उड्डाणपुलासाठी एम ४० ग्रेड सिमेंटच्या प्रस्ताव मंजूर असताना ६० एम ग्रेड बदलाला मंजुरी देण्यात आली.

त्यामुळे पुलाच्या किमतीमध्ये ४४ कोटी रुपयांची वाढ झाल्याचा दावा करण्यात आला. उड्डाणपूल तयार करण्यासाठी जवळपास ५०० झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणप्रेमींनीदेखील उच्च न्यायालयात धाव घेतली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलासाठी म्हणून दर्जा प्राप्त झालेल्या वृक्षांचादेखील बळी दिला जाणार असल्याची ओरड करून आंदोलनदेखील झाले. उड्डाणपुलावरून राजकारण तापले असताना आयआयटी पवईकडून फुलांची व्यवहारता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयआयटी पवईने पुलांची आवश्यकता नसल्याचे अहवालात म्हटले. त्यानंतर उड्डाणपूल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु विधानसभेमध्ये माजी पालकमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दोन्ही उड्डाणपूल संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना नगर विकास विभागाने महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार फुलांचे काम रद्द झाले नसल्याचे स्पष्ट केले. कार्यारंभ आदेश देऊनही ठेकेदारांनी काम सुरू केल्याने नोटीस देण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Relief: केशरी रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; ३ महिने मिळणार मोफत धान्य

26/11 Mumbai Attacks: मृत्यू समोर दिसत होता, पण माईक हातातून सोडला नाही! २६/११ च्या रात्री रेल्वे अनाउंसर बनला शेकडो प्रवाशांचा आधार

India WTC Final Qualification Scenarios: टीम इंडियाची झोप उडाली... IND vs NZ दुसरी कसोटी अनिर्णित किंवा पराभूत झाल्यास काय? WTC Final साठी कसं असेल समीकरण?

Latest Marathi News Live Update: मध्य प्रदेश सीमेवरील सीमा तपासणी नाका बॉम्बने उडवण्याची धमकी

Shivaji University Convocation : शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी! राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या तनुजाचे पुढचे ध्येय वाचून तुम्हीही कराल कौतुक; वेदिकानही केलं वडिलांचं स्वप्न पूर्ण

SCROLL FOR NEXT