Ticket checking esakal
नाशिक

Indian Railway | फुकट्या प्रवाशांकडून साडेसात लाखांची वसुली

central railway

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : मध्य रेल्वेने (central railway) फुकट्या प्रवाशांविरोधात राबविलेल्या मोहिमेत मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकातून एक लाख प्रकरणातून ७.६६ लाख रुपयांची दंडात्मक वसुली प्रशासनाने केली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गेल्या आर्थिक वर्षात तिकिट तपासणीदरम्यान ८ लाख ६५ हजार केसेसमधून ६२.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ४४ कोटींचा महसूल गोळा करणारे भुसावळ स्थानक विभागात अव्वल ठरले आहे. सुमारे ७१ लाखांच्या दंडवसुलीसह नाशिक रोड रेल्वेस्थानक चौथ्या स्थानी आहे.

रेल्वे मंत्रालयाेची मोहीम

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेनंतर रेल्वे मंत्रालयाने देशभरात विशेष कोविड रेल्वेगाड्या सुरू केल्या. या गाड्यांमधून केवळ आरक्षित तिकिटावर प्रवासाची मुभा प्रवाशांना देण्यात आली. तरीही अनेक प्रवाशांनी विनातिकिट, तिकिट कन्फर्म नसताना प्रवास करणे व एका रेल्वेच्या तिकिटावर दुसऱ्याच गाडीने प्रवास करण्याचे प्रकार घडले. यामुळे अशा प्रवाशांविरोधात रेल्वे मंत्रालयाने मोहीम राबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

मध्य रेल्वेने भुसावळ विभागात खंडवा ते इगतपुरी मार्गावर तिकिट तपासणी मोहीम राबविली. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत विभागात ८ लाख ६५ हजार प्रकरणांची नोंद झाली. या प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून ६२.६ कोटींची रक्कम वसूल केली . विभागात दंडवसुलीत भुसावळ रेल्वेस्थानकात ५.८७ लाख प्रकरणांतून रेल्वेला ४४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्याखालोखाल खांडवा रेल्वेस्थानकात १.३ लाख प्रकरणांमधून ८.६ कोटी, तर मनमाडला १ लाख प्रकरणांतून ७.६६ रुपये मिळाले. नाशिक रोड स्थानकाने १२.७६१ प्रकरणांमधून सुमारे ७१ लाखांची दंडवसुली केली. कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांची संख्या कमी होती. त्यामुळे तिकिट तपासणीसाठी कर्मचारी वाढविले होते, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगावकरांचा श्वास कोंडला! महामार्गावर धुळीचे लोट, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांकडे बोट

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Latest Marathi News Live Update: आठ महिन्यांच्या मुलीला प्राण्याने उचलून नेले, अर्धवट मृतदेह आढळला

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

SCROLL FOR NEXT