fire bike showroom.png
fire bike showroom.png 
नाशिक

किती सहन करणार..शेवटी शोरूमसमोरच 'त्याने' चक्क पेटविली बाईक 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुचाकीमालक युवक अनेकदा शोरूममध्ये दुरुस्तीसाठी आला. प्रत्येक वेळी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत दुचाकीत असलेली दुरुस्ती करून दिली नाही. त्यामुळे बुधवारी (ता. 22) दुपारी तो पुन्हा दुचाकी घेऊन शोरूममध्ये आला आणि दुचाकीची दुरुस्ती करून द्या वा दुचाकी बदलून देण्याची त्याने मागणी केली; परंतु...

...तर यामुळे पेटविली बाईक

त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीसमोर दुचाकी वाहनांचे शोरूम आहे. अंबड परिसरात राहणाऱ्या युवकाने याच शोरूममधून काही दिवसांपूर्वी दुचाकी खरेदी केली होती. दुचाकीच्या (एमएच 15, जीझेड 1493) वायरिंगमध्ये दोष आहे. त्यासाठी दुचाकीमालक युवक अनेकदा शोरूममध्ये दुरुस्तीसाठी आला. प्रत्येक वेळी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत दुचाकीत असलेली दुरुस्ती करून दिली नाही. त्यामुळे बुधवारी (ता. 22) दुपारी तो पुन्हा दुचाकी घेऊन शोरूममध्ये आला आणि दुचाकीची दुरुस्ती करून द्या वा दुचाकी बदलून देण्याची त्याने मागणी केली; परंतु शोरूममधील दुरुस्ती विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यास "दुचाकी परत घेऊन जा आणि नंतर ये' असे सांगितले. सतत हेलपाटे मारावे लागत असल्याने वैतागलेल्या दुचाकीमालकाने शोरूमसमोरच दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तत्काळ सातपूर अग्निशमन दलास खबर देण्यात आली. अग्निशमन विभागाचे वाहन काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पेटलेली दुचाकी विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे किशोर पाटील, राजेंद्र मोरे, नाना गांगुर्डे, गुलाब पवार आदींनी परिश्रम घेतले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत रात्रीपर्यंत नोंद नव्हती. 

परंतु दुचाकी खाक झाली होती...

नवीनच घेतलेल्या दुचाकीमध्ये दोष असताना, तो दुरुस्त करून देण्याऐवजी शोरूममधील कर्मचाऱ्यांनी दुचाकीमालकाला हेलपाटे मारण्यास भाग पाडले. दुचाकीमालकाने वैतागून शोरूमसमोरच दुचाकी पेटविल्याची घटना बुधवारी (ता. 22) दुपारी घडली. अग्निशमन दलाने आग विझविली, परंतु दुचाकी खाक झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

SCROLL FOR NEXT