fire in godown in niphad esakal
नाशिक

द्राक्ष व्यापाऱ्याच्या गोदामाला आग लागून लाखांचे नुकसान

माणिक देसाई

निफाड (जि.नाशिक) : मानोरी फाटा येथील द्राक्ष व्यापाऱ्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना आज (ता. २७) पहाटे घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मानोरी फाटा येथील द्राक्ष व्यापारी संदिप डुकरे यांच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या लक्षात ही बाबत आल्याने त्यांनी तात्काळ संदिप डुकरे यांना कळविले. येवला येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत व्यापाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

द्राक्ष क्रेट आणि पॅकिंग पुठ्ठे यांची साठवणूक या गोदामात असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अठरा हजार क्रेट, पॅकिंग टेप, पुठ्ठे, वजनकाटे, एक मोटारसायकल आदी साहित्य जळून खाक झाले आहे. अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT