nashik municipal corporation
nashik municipal corporation e-sakal
नाशिक

एकीकृत नियमावलीच्या ऑनलाइन परवानगीचा पहिला मान नाशिकला

विक्रांत मते

नाशिक : राज्य शासनाने गेल्या वर्षीच्या अखेरीस मुंबई वगळता संपूर्ण राज्यासाठी विकसित केलेल्या एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीची पहिली ऑनलाइन परवानगी देण्याचा मान नाशिक महापालिकेला मिळाला आहे. शासनाच्या महाआयटीच्या कंपनीने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे पहिली ऑनलाइन बांधकाम परवानगी नाशिक महापालिकेने बुधवारी (ता. १६) दिली. (first Online permission of integrated construction regulations is given in Nashik )

महाआयटीद्वारे संगणकप्रणाली विकसित

राज्य शासनाने मुंबई वगळता संपूर्ण राज्यासाठी एकीकृत विकास नियमावली अमलात आणली आहे. या नियमावलीनुसार महापालिका, पालिकांमध्ये बांधकाम परवानग्या मिळण्यास सुरवात झाली आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर महापालिका किंवा पालिकांनी विकसित केलेल्या ऑटो डीसीआर (Auto DCR) संगणकप्रणालीच्या माध्यमातून परवानगी दिली जात होती. नवीन विकास नियंत्रण नियमावली लागू झाल्याने ऑनलाइन परवानगी देण्यासाठी राज्य शासनाने महाआयटी कंपनीच्या सहकार्याने संगणकप्रणाली विकसित केली आहे. त्यांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रायोगिक तत्त्वावर एकूण १८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यात संगणकप्रणालीतून नाशिक महापालिकेने सर्वांत पहिली परवानगी बुधवारी दिली.

बांधकाम परवानगी आता ऑनलाइन पद्धतीने

संगणकप्रणालीमुळे नागरिक, वास्तुविशारद, अभियंत्यांना कार्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने परवानगी मिळविता येणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगररचना संचालक नांगनुरे, सहसचिव तथा संचालक शेंडे, सहसंचालक प्रतिभा भदाणे, तसेच शासन नियुक्त संगणकप्रणाली विकसित करण्यासाठी असलेल्या टीमचे सहसंचालक अविनाश पाटील, सहसंचालक (निवृत्त) प्रकाश भुक्ते व शैलेंद्र बेंडाळे, शहर विकास व नियोजन अधिकारी ठाणे महापालिका यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील सर्वप्रथम परवानगीपत्र आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते वास्तुविशारद अजित कुलकर्णी यांना बुधवारी देण्यात आले. या वेळी नगररचना सहसंचालक प्रतिभा भदाणे, सहाय्यक संचालक अंकुश सोनकांबळे, नगरनियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

(first Online permission of integrated construction regulations is given in Nashik )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT