school-student.jpg 
नाशिक

इतिहासात प्रथमच 'या' महापालिकेने केली शिक्षण विभागासाठी भरघोस आर्थिक तरतूद...!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिक्षण विभागासाठी सर्वाधिक भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली असून, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विविध योजनांचा समावेश असलेले 97.37 कोटींचे स्वतंत्र अंदाजपत्रक शिक्षण विभागासाठी जाहीर केले. 

97.37 कोटींचे स्वतंत्र अंदाजपत्रक शिक्षण विभागासाठी जाहीर

नाशिक महापालिकेचे सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे 2 हजार 161 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (ता.25) रोजी स्थायी समितीला सादर केले. या अंदाज पत्रकात कोणतीही करवाढ सूचविण्यात आली नसली तरी पाणी पुरवठ्याचा खर्च वसूल करण्यासाठी उपभोक्ता आकार लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिक्षण विभागासाठी सर्वाधिक भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली असून, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विविध योजनांचा समावेश असलेले 97.37 कोटींचे स्वतंत्र अंदाजपत्रक शिक्षण विभागासाठी जाहीर केले. 

गुणवत्तावाढीसाठी विविध योजना अमलात आणल्या जाणार

महापालिकेच्या शाळांमध्ये 31 हजार 231 विद्यार्थी शिकतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध योजना अमलात आणल्या जाणार आहेत. यात सहा ते 14 वयोगटातील मुलींसाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजल मशीन ठेवले जाणार असून, त्यासाठी अंदाजपत्रकात 40 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बूट व मोजे दिले जाणार आहेत.

निवासी शाळेत मुलभूत सुविधा पुरविल्या जाणार

विद्यार्थ्यांना धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीची तरतूद करण्यात आली आहे. दूषित पाण्यापासूनचे आजार टाळण्यासाठी प्रत्येक शाळेत वॉटर प्युरिफायर दिले जाणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविली जाणार आहे. नाशिक-पुणे रोडवरील जेतवननगर शाळेत 50 विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत मुलभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. शारीरिक विकासासाठी सर्व शाळांमध्ये क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT