Accidental vehicles esakal
नाशिक

Nashik Accident News : सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह 5 जण ठार

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात घडला असून या अपघातात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Five people killed in horrific accident at Mohdari Ghat near Sinnar Nashik Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील एका नामांकित महाविद्यालयामधील 8 ते 9 विद्यार्थी स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचे अचानक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडर वरून पलटी घेत सिन्नरकडे येणाऱ्या इनोवा व स्विफ्ट कारवर येऊन धडकली. मोहदरी घाटात सायंकाळी पाचच्या सुमारास हा तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला.

यामुळे कारमधील हर्ष बोडके, मयुरी पाटील, शुभम ताडगे, सायली पाटील व प्रतिक्षा घुले विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड व ईनोवा कारमधील सुनील दत्तात्रय दळवी व अन्य दोन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात तर काहींना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातग्रस्त गाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्भवती आई अन् आठ वर्षांचा मुलगा... एका रात्रीत देशाबाहेर! न्यायालयातील थरारक क्षण, CJJ Suryakant यांचा मोदी सरकारला फक्त एक सवाल!

Kolhapur Politics : कागलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! तृतीयपंथी उमेदवाराचा लिंबू, अंडी फेकल्याचा आरोप; १० नगरपरिषदा, ३ नगरपंचायतींसाठी मतदान सुरू

Latest Marathi News Live Update : बीड शहरातील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मोठा गोंधळ

Solapur Crime : घरात कोणी नसताना १६ वर्षाच्या मुलीने लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने घेतला गळफास; तिने का उचललं टोकाचं पाऊल?

PMP Bus Pass : पास महागल्याने पीएमपीकडे पाठ; सहा महिन्यांत पासधारक ३२ टक्क्यांनी घटले

SCROLL FOR NEXT