flood line of Godavari river will be changed nashik news esakal
नाशिक

Nashik News: नंदिनी पाठोपाठ गोदावरी पूररेषा घटविण्याचा घाट; बिल्डर्स लॉबी सक्रिय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : काही ठराविक बिल्डर्स डोळ्यासमोर ठेवून सातपूर भागात जवळपास दोन किलोमीटर नंदिनी नदीची पूररेषा कमी करण्यात आल्यानंतर बिल्डर्स लॉबीला होणारा फायदा लक्षात घेता गोदावरी नदीची पूररेषा बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे.

पूररेषा कमी करताना काही बंधारे तोडण्याचे प्रस्ताव सादर करून पुराचे प्रमाण कमी झाल्याचे दर्शविण्याची तयारी सुरू झाल्याने अनेक वर्षांपासून पूररेषेमुळे बाधित झालेल्या सर्वसामान्यांच्या मालमत्ता मात्र तशाच लटकणार आहे. (flood line of Godavari river will be changed nashik news)

२००९ मध्ये गोदावरी, नंदिनीसह उपनद्यांना मोठा पुर आल्यानंतर पाटबंधारे विभागाने पूररेषा आखण्याचा निर्णय घेतला. गोदावरी, नंदिनी तसेच अन्य उपनद्यांच्या दोन्ही तीरावर लाल व निळ्या रंगाची पूररेषा आखण्यात आल्याने दोन्ही किनाऱ्यावरच्या हजारो मालमत्ता बाधित झाल्या आहेत. पूररेषा टाकण्यात आल्याने त्या रेषेच्या आत किंवा ठराविक अंतर सोडून बांधकामे करता येत नाही. त्याशिवाय पुनर्विकासदेखील करता येत नाही.

महापालिकेने स्टील्ट बांधकामे करण्यास परवानगी दिली असली तरी यापूर्वी करोडो रुपये खर्च करून बांधकामे केल्याने आता खर्च परवडत नाही. पाटबंधारे विभागाने आखलेली पूररेषा चुकीची असल्याची भूमिका महापालिकेची असून, नवीन पूररेषा आखण्याची मागणी आहे. परंतु शासनाकडून दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधीदेखील पूररेषा बदलण्यात अपयशी ठरले आहे. नवीन पूररेषा तयार होण्याची कुठलीच चिन्हे दिसतं नसल्याने आता विविध कारणे दाखवून पूररेषा कमी केली जात आहे.

हालचाली गतिमान

गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीची पूररेषा कमी करण्यात आली आहे. नंदिनी नदीची लांबी १४ किलोमीटर असून, २००६ पूर्वी नदीवर मोठ्या प्रमाणात पूल व बंधारे होते.

पाटबंधारे खात्याने पूररेषा निश्‍चित केली. त्यानंतर नदीवरील छोटे पूल व बंधारे काढून ते मोठे केल्याने नदीला पूर येण्याचे प्रमाण कमी झाले. सातपूर गावातील दोन किलोमीटर भागात पूररेषा कमी करण्यात आली.

काही बांधकाम व्यावसायिकांनी डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार केला गेला. त्यामुळे पूररेषेच्या कचाट्यातून तेथील मिळकत सुटली आहे. परंतु त्याआधारे गोदावरी नदीच्या जवळपास आनंदवली, गंगापूर भागाकडून पूररेषा कमी करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

आनंदवली, चांदशी भागात नंदिनी पॅटर्न

गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूने लाल व निळी पूररेषा आखण्यात आली आहे. या पूररेषेमुळे २०१० पासून बाधित मिळकतींचा विकास थांबला आहे. जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपयांची मालमत्ता अडकली आहे.

शेती व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करता येणार नाही. इमारतींचा पुनर्विकासदेखील करता येणार नाही. त्यामुळे नंदिनी पॅटर्न वापरून पूररेषा कमी करण्याचा घाट घातला जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाले आहे. आनंदवली, चांदशी, गंगापूर गाव, फॉरेस्ट नर्सरी भागात असे प्रयत्न होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT