Someshwar temple latest marathi news
Someshwar temple latest marathi news esakal
नाशिक

नाशिक : सोमेश्‍वरला लोटला भक्तीचा महापूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या निसर्गरम्य सोमेश्‍वर महादेव मंदिरात सोमवारी (ता. १) भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी दर्शनरांगा लांबवर पोचल्या होत्या.

पहाटेच्या काकड आरतीनंतर भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आल्यावर उशिरापर्यंत गर्दी कायम होती. (Flood of devotion to Someshwar Nashik shravan 2022 Latest Marathi News)

पहाटे सहा वाजता देवस्थानचे अध्यक्ष गोकुळ पाटील यांच्या हस्ते महापूजा पार पडली. या वेळी विश्‍वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी गंगापूर पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांच्या उपस्थितीत आरती झाली.

या वेळी भाविकांना खिचडी, केळी व अन्य प्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोलमडून गेलेले अर्थकारणही काही प्रमाणात बहरले. गत महिन्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाविकांना त्रास नको, म्हणून या वर्षी देवस्थानतर्फे मंदिरासमोर प्रथमच मंडपाची व्यवस्था करण्यात आल्याचे देवस्थानचे विश्‍वस्त बाळासाहेब लांबे यांनी सांगितले.

यात्रोत्सव सुरळीत पार पडावा म्हणून देवस्थानचे अध्यक्ष, विश्‍वस्तांसह गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सज्ज असल्याचे श्री. लांबे यांनी सांगितले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सोमेश्‍वर मंदिराच्या आवारात विविध खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत. याशिवाय गोदापात्रातील बोटींगलाही भाविकांकडून मोठी पसंती मिळत आहे. एकंदरीत तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर सोमेश्‍वरच्या अर्थकारणास ‘बूस्ट’ मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT