andh savita 1.jpg 
नाशिक

VIDEO : "मी अंध असूनही त्यावर मात करू शकली..मग तुम्ही का नाही?"

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / दाभाडी : "एका भयावह आजारातून मुक्त होत घरी जायला मिळणं ही लहान गोष्ट नाही. मी अंध असूनही त्यावर मात करू शकली याचा आनंद अधिक आहे. क्वारंन्टाईन काळात चांगल्या सुविधा मिळाल्याने आजचा दिवस उजडला" असं एका अंध कोरोना फायटर्स कडून सांगण्यात आले.

सात रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने गावाला सुखद धक्का

दाभाडी येथील विलगीकरण केंद्रात उपचार घेत असलेल्या बारा रुग्णांपैकी सात रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने ग्रामस्थांना सुखद धक्का मिळाला. सात रुग्णात एक अंध तर एक गर्भवती महिलेचा समावेश आहे. इंदूबाई हिरे वसतीगृहातील विलगीकरण केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी सात रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. कोरोनाचे चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णांवर उपचार सुरू होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांच्या पथकाने मेहनत घेत हे केंद्र अद्ययावत ठेवण्यात आले. बऱ्या झालेल्या रुग्णांवर पुष्पवृष्टी करण्यात आलीयावेळी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे सह तालुका आरोग्य अधिकारी वर्ग व नातलग उपस्थित होते.

उर्वरित रुग्ण बरे व्हावेत

यावेळी कृषिमंत्री भुसे, शशिकांत निकम, येथील सरपंच चारुशीला निकम, मनोज पाटील, तलाठी पी.पी.मोरे, डॉ.देवेंद्र निकम,मराठा महासंघाचे अमोल निकम, हरी निकम, माणुसकी फाउंडेशन नानाजी निकम, संजय निकम, सतीश भामरे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सात रुग्ण बरे झाल्याने गेल्या पंढरवाड्यापासून तणावात असलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रुग्णांच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करत लवकरच उर्वरित रुग्ण बरे व्हावेत अशी करुणा भाकली जात आहे.दरम्यान घरी सोडलेल्या सात ही रुग्णांना स्वतःच विलगीकरण करून राहायचं असल्याची त्यांना माहिती व औषधी देण्यात आलीत.

मी अंध असूनही त्यावर मात करू शकली
एका भयावह आजारातून मुक्त होत घरी जायला मिळणं ही लहान गोष्ट नाही. कोरिन्टाईन काळात सेवाभावी संस्था आणि आरोग्य विभागाच्या चांगल्या मदतीचा प्रत्यय आला.या केंद्रात खुप चांगल्या सुविधा मिळाल्याने आजचा दिवस उजडला. मी अंध असूनही त्यावर मात करू शकली याचा आनंद अधिक आहे - सविता निकम, दाभाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT