Focus on organizational building ahead of elections Sanjay Raut Nashik News esakal
नाशिक

निवडणुकांच्या तोंडावर संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्या : संजय राऊत

विनोद बेदरकर

नाशिक : आगामी महापालिका निवडणुका चार दिवसांनी होवो की, चार महिन्यांनी निवडणूका जिंकण्यासाठी आवश्यकतेनुसार शिवसेनेच्या (Shivsena) संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्यावे. प्रभागनिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay raut) यांनी दिल्या.

आगामी महापालिका निवडणुकांची (Municipal elections) तोंडावर शिवसेनेने नाशिक शहरातील शिवसेनेच्या कोअर कमिटी तयार केली आहे. त्यात, जुन्या- नव्या अनुभवी पदाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. शुक्रवारी (ता. १५) महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची श्री. राऊत यांनी बैठक घेत निवडणुकांच्या तयारीवरच फोकस ढळू न देण्याच्या सूचना दिल्या. उपनेते सुनील बागूल, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, माजी महानगरप्रमुख जयंत दिंडे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, महेश बडवे आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. राऊत दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या नाशिक शहरातील दौऱ्यात श्री. राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. महापालिकेच्या अनेक प्रभागातील कामांचा शुभारंभ होणार आहे. या दौऱ्यादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे याही शासकीय आढावा बैठकीच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर होत्या. शिवसेनेच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉ. गोरे यांची भेट घेतली.

फोकस स्थिर ठेवा

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी व त्यासाठी गरजेनुसार बूथ किंवा प्रभाग अंर्तगत संघटनात्मक बदलांचा आढावा घेण्याच्या सूचना श्री. राऊत यांनी दिल्या. निवडणुका केव्हाही लागल्या तरी, निवडणुकांवरच फोकस व तयारी कमी पडणार नाही यासाठी कार्यकर्त्यांवर बूथनिहाय सोपविलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला जावा. कार्यकर्ते सक्रिय राहतील, याची काळजी घेण्यावर बैठकीत सूचनांचा भर होता. बूथनिहाय आणि प्रभागनिहाय आढावा घेत प्रसंगी गरजेनुसार आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT