traffic esakal
नाशिक

Nashik Traffic Problem : वाहतूक कोंडी सोडविण्यावर ‘फोकस’; नो-पार्किंगमधील वाहनांवर ई-चलानान्वये कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Problem : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कारवाई केली जाते. तसेच, ई-चलनाद्वारे ऑनलाइन दंडात्मक कारवाईही केली जाते. परंतु तरीही शहरातील काही चौक व रस्त्यांवरील कोंडीची समस्या सुटलेली नाही.

याबाबत आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतलेल्या वाहतूक शाखेच्या बैठकीत वाहतूक कोंडी सोडविण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देतानाच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि नो-पार्किंगमधील वाहनांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.(Focus on solving traffic problem by Commissioner Sandeep Karnik nashik news)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आयुक्तालयातील विविध विभागांची स्वतंत्र बैठका घेत आहेत. त्यानुसार, शहर वाहतूक शाखेची बैठक घेण्यात आली. या बैठकीला गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह वाहतूक शाखेच्या चारही विभागाचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील माहिती घेतल्यानंतर आयुक्तांनी वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि त्यामागील कारणांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे, अपघाती मृत्यूंचे प्रमाण आणि त्यांची नेमकी कारणे याचीही माहिती घेतली.

वाहतूक नियमांचे उल्लंघनामुळे अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने, उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करणे, भरधाव वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर नसणे, सीटबेल्टचा वापर न करणे अशी अपघाती मृत्यूमागील कारणे असल्याचे वाहतूक शाखेच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले. त्याबाबत रॅशड्रायव्हिंग करणाऱ्या व विरुद्धदिशेने वाहने चालविणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करताना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे, वाहतूक कोंडी ही मोठी समस्या असून, ती सोडविण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर जागेवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पार्किंगसंदर्भात महापालिका आणि स्मार्टसिटी विभागाकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करण्याच्याही सूचना आयुक्तांनी केल्या.

''शहरात अपघाती मृत्यू अधिक असल्याने ते टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देणे आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यावर चर्चा झाली. त्यावर लवकरच सकारात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहे.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT