sambhaji nagar sakal
नाशिक

Nashik Winter Update : सकाळी धुके, दिवसभर कमी 'व्‍हिजिब्‍लिटी'; वार्यामुळे वाढला गारठा

गेल्‍या काही दिवसांपासून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता पुन्‍हा जाणवू लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : गेल्‍या काही दिवसांपासून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता पुन्‍हा जाणवू लागली आहे. सकाळच्‍या वेळी दाट धुके तर दिवसभर दृष्यमानता (व्‍हिजिब्‍लिटी) कमी असल्‍याने सुर्यकिरणाचा प्रभाव सौम्‍य झाल्‍याचे नाशिककरांना अनुभवायला मिळते आहे.

दरम्‍यान रविवारी (ता.७) नाशिकचे किमान तापमान १६.९ अंश सेल्‍सिअस तर कमाल तापमान २८.८ अंश सेल्‍सिअस राहिले. मंगळवारी (ता.९) हलक्‍या स्वरूपात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Fog in morning low visibility throughout day nashik winter news)

यंदाच्‍या हंगामात नाशिककरांना अपेक्षेप्रमाणे गारठा अनुभवायला मिळालेला नाही. नोव्‍हेंबरपासून सातत्‍याने पाऱ्यात चढउतार बघायला मिळत आहे. सद्यःस्‍थितीत पारा फारसा खालावलेला नसला तरी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवते आहे. रविवारी ताशी ३.७ किलोमीटर या वेगाने वारे वाहत असल्‍याची नोंद हवामान खात्‍याने घेतली आहे.

राज्‍यात विविध भागांमध्ये आगामी आठवड्यात पावसाचा अंदाज व्‍यक्‍त केलेला असताना, नाशिकलाही अवकाळीचा फटका बसण्याची दाट शक्‍यता आहे. मंगळवारी (ता.९) हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. यानंतर पाऱ्यात घसरण होऊन थंडीचे प्रमाण आणखी वाढण्याचीदेखील शक्‍यता आहे. त्‍यामुळे आगामी काही दिवसांत नाशिककरांना थंडीची अनुभूती घ्यायला मिळणार आहे.

आठवड्याभरात पाऱ्यामध्ये चढ-उतार

गेल्‍या आठवड्याभरात पाऱ्यात मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळात आहे. गुरुवारी (ता.४) नाशिकचे किमान तापमान १५.६ अंश सेल्‍सिअस तर कमाल तापमान २९.५ अंश सेल्‍सिअस नोंदविले गेले होते. शुक्रवारी (ता.५) पाऱ्यात घसरण होऊन किमान तापमान १२.८ अंश तर कमाल तापमान २९.३ अंश नोंदविले.

काल (ता.६) किमान तापमान १३.५ अंश तर कमाल तापमान २६.४ अंश सेल्‍सिअस होते. रविवारी किमान तापमानात तीन अंशांनी वाढ होऊन किमान तापमान १६.९ अंश सेल्‍सिअस तर कमाल तापमान २८.८ अंश सेल्‍सिअस नोंदविले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT