Food and Drug Department big operation in Nashik esakal
नाशिक

Nashik : नाशिकमध्ये 'एफडीए'ची मोठी कारवाई; 1 कोटींचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

गेल्या काही दिवसांपासून एफडीएनं (FDA) नाशिकमध्ये (Nashik) धडक कारवाई सुरु केलीय.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून एफडीएनं (FDA) नाशिकमध्ये (Nashik) धडक कारवाई सुरु केलीय. आता नाशकात पुन्हा अन्न आणि औषध विभागानं (Food and Drug Department) वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत तब्बल 1 कोटींचं खाद्यतेल जप्त केलंय. या कारवाईत मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचं खाद्य तेल जप्त करण्यात आलंय.

पथकानं वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केलीय. नाशिकमध्ये उच्च प्रतीचं खाद्यतेल असल्याचं भासवून कमी दर्जाचं तेल ग्राहकांच्या माथी मारलं जात असल्याचा संशय अन्न आणि औषध विभागाला होता. यावेळी त्यांनी छापा टाकून ही कारवाई केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गावाजवळच्या माधुरी रिफायनर्स कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं छापा टाकला. यावेळी तेलाच्या डब्यांवर फोर्टीफाइड तेलाचा उल्लेख प्रत्यक्षात होता. मात्र, पल्स एफचा सिम्बॉल नसल्याचं समोर आलं. या छाप्यात १ कोटी १० लाख ११ हजार २८० रुपयांच्या खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय. दरम्यान, खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे 32 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी मेळासाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक

Supreme Court: मोठी बातमी! मुलांच्या बालपणी पालकांनी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Yuzvendra Chahal: माँ कसम खाओ... चहलची पोस्ट व्हायरल; धनश्रीवर साधला निशाणा

Nilesh Ghaywal Case : कोथरूड गोळीबार प्रकरणातील गुंड नीलेश घायवळचे पारपत्र रद्द

Central Railway: दिवाळी संपली तरीही गिफ्टचा धडाका सुरूच! आणखी विशेष गाड्यांची घोषणा; रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT