bibtya 7.jpg
bibtya 7.jpg 
नाशिक

दिसले 'त्याच्या' पायांंचे ठसे अन् ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट!

दिपक घायाळ

नाशिक / विंचूर : विंचूर येथून जवळच असलेल्या  हनुमाननगर (ता.निफाड) परीसरात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायांंचे ठसे दिसून आल्याने परिसरात बिबट्याचा संचार असल्याची शंका नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे सावट पसरले आहे. 

पंधरा ते वीस फुट अंतरावर फरफटत नेली शेळी
(ता. 30) लोळगे वस्तीलगत असलेल्या कडलग मळ्यात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पावलांचे ठसे आढळले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वनाथ लहानु कडलग यांची शेळी घरापासून पंधरा ते वीस फुट अंतरावर फरफटत नेली व अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आली. तसेच सहा सात दिवसापूर्वी जाधव वस्तीवर देेेखील विजय जाधव यांच्या घराजवळील शेळ्यांच्या शेड जवळ असेच पावलांचे ठसे आढळून आले होते.परंतु जाधव यांचे शेळ्यांचे शेड लोखंडी जाळी युक्त व पक्के असल्याने शेळ्यांचे कुठलेही नुकसान झाले नाही.

त्यामुळे पुढेे होणारे अनर्थ टाळले जातील

सदरील पावलांंचे ठसे व विश्वनाथ कडलग यांची अर्धधवट फस्त केलेली शेळी यावरून हनुमाननगर परीसरात बिबट्या सदृश्य प्राणी असल्याची नागरीकांची धारणा झाली आहे.यामुळे भेदरलेले नागरिक सोशल मिडियमच्या माध्यमातून एकमेकांना सावध राहण्याचे संंदेश पाठवित आहेत.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्राण्याच्या पावलांच्या ठश्यांची शहानिशा करून या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.त्यामुळे पुढेे होणारे अनर्थ टाळले जातील. अशी मागणी हनुमाननगर येथील नागरिकांनी केली आहे.


बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असल्याने वनविभागाने याची शहानिशा करून त्वरित बंदोबस्त करावा.- सीताराम कडलग,शेतकरी हनुमाननगर .


संपादन - ज्योती देवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT