Villagers and youth present for the meeting
Villagers and youth present for the meeting esakal
नाशिक

Nashik : गावाच्या सुरक्षेसाठी पाथर्डी गावातील तरुणाई जेष्ठांसह रस्त्यावर!

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : पाथर्डी गावात प्रवेश करू पाहणाऱ्या विघातक प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी रविवारी (ता. ६) रात्री ज्येष्ठांसोबत तरुणाई रस्त्यावर उतरली. गावाचं गाव पण जपण्यासाठी ‘लढायचं सत्तेसाठी नव्हे, तर गावाच्या हितासाठी आणि विकासासाठी, असा नारा देत गावाचं गाव पण हिरावू पाहणाऱ्या प्रवृत्तींना ठाम विरोध करण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (for security of Pathardi village youth on street with elders Nashik Latest Marathi News )

पाथर्डीत विशेषतः रात्री १० नंतर येथे टवाळखोरांचा वावर सुरू होता. यानिमित्ताने येणारी ही टारगट मंडळी मग गावातील महिला आणि युवतींच्या छेडछाडीपर्यंत पोचली होती. हनुमान मंदिर, महापालिका शाळा, खंडोबा मंदिर या भागात बसून सर्रास दारू, गांजा आदीच्या पार्ट्या झडू लागल्या होत्या. गावातील अनेक ज्येष्ठांनी याबाबत अनेकांना समज दिली. मात्र त्यात फरक पडला नाही. अखेर गावातील तरुणाई पुढे सरसावली आणि सायंकाळी येथे मारुती मंदिरात सभा बोलावण्यात आली. संपूर्ण गाव येथे जमा झाला.

उपस्थितांनी सध्या गावात सुरू असलेल्या चुकीच्या बाबी प्रकाशात आणल्या. याबाबत आता सावध झालो नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल या निर्णयाप्रत सर्वजण आले. सर्वांच्या सहमतीने गावासाठी कठोर नियमावली तयार झाली. त्यानुसार या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या सर्व टपऱ्या, दारू दुकाने रात्री दहा वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. टपऱ्या आणि दुकानांच्या परिसरात असलेले अतिक्रमण स्वतःहून तातडीने हटवून घेण्याची तंबी या सर्वांना देण्यात आली.

एकादशी, शिवरात्री, चतुर्थी आदी दिवशी गावातील मटण आणि चिकन दुकाने सक्तीने बंद ठेवण्यात येतील, असे ठरवण्यात आले. मंदिर आणि गाव परिसरात बाहेरची कुणीही व्यक्ती रात्री दहानंतर कामाव्यतिरिक्त फिरणार नाही याची काळजी घेण्यासाठी गावातील तरुणाईने दक्षता पथके तयार करण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर पहिल्याच दिवशी शेकडो युवकांनी संपूर्ण गाव परिसरात फेरफटका मारून सर्व गाव बरोबर रात्री दहाच्या ठोक्याला चडीचूप केले.

सामाजिक सलोखा आणि गाव परिसरातील उच्चवर्धित मूल्य शिक्षण याला हानी पोचणार नाही याबाबत एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी माजी नगरसेवक भगवान दोंदे, मदन डेमसे, एकनाथ नवले, सुनील कोथमिरे, शारदा दोंदे, त्र्यंबक कोंबडे, किरण कोंबडे, बाळकृष्ण शिरसाट, मंगेश धोंगडे, खंडेराव धोंगडे, प्रसाद शेजवळ, रतन डेमसे, शिवाजी भुसारे, तुषार कोंबडे, सचिन बेरड, समाधान मोंढे, प्रमोद जाचक आदींसह ज्येष्ठ नागरिक आणि युवक उपस्थित होते.

"अनेक दिवसांपासून अशा पद्धतीची चुकीची वागणूक करणाऱ्या अनेकांना समज देत होतो. मात्र आता शहरभर गावाची बदनामी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या बैठकीद्वारे कडक आचारसंहिता आणि नियमावली तयार करण्यात आली असून सर्वानुमते ती पाळण्यात येणार आहे".- मदन डेमसे, स्थानिक युवक

"आधी गाव महत्त्वाचे आहे. बाकी सर्व बाबी गौण आहेत. कोणत्याही प्रकारे गावाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचणार नाही. याची सर्वांनी जबाबदारी घेतली आहे. शिवाय संबंधित अपप्रवृत्तींना एक थेट इशारा देण्याचा हा सकारात्मक प्रयत्न आहे."- भगवान दोंदे, माजी नगरसेवक

"याप्रकरणी गावातील युवकांसह ज्येष्ठांनी आपले पक्षिय जोडे बाहेर ठेवून गावाच्या भल्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पाळण्याचा संपूर्ण गावाने एकमुखी निर्णय घेतला आहे." - किरण कोंबडे, स्थानिक युवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT