Eyes Infection esakal
नाशिक

Nashik Eye Infection: डोळे आल्यास विद्यार्थ्यांना सक्तीने सुटी द्या! महापालिका आयुक्तांच्या सूचना

रुग्णांचा आकडा सहा हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Eye Infection : मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात फैलावत असून, विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहे.

शुक्रवारी (ता. १८) नव्याने २८२ रुग्णांची नोंद झाली. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विद्यार्थ्यांना डोळे आले असल्यास सक्तीने सुटी देण्याचे आवाहन शाळा प्रशासनाला केले आहे. (Forced leave of students if they get eyes infection NMC Commissioner instructions nashik news)

राज्यात डोळ्यांची साथ सुरू आहे. महापालिका हद्दीत मागील पंधरवड्यात मोठ्या संख्येने डोळ्यांचे रुग्ण वाढले आहे. महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन, बिटको, इंदिरा गांधी रुग्णालय तसे मोरवाडी येथील श्री. स्वामी रुग्णालयात आतापर्यंत ६०८२ डोळ्यांच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आवाहन केले आहे. महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहे. महापालिकेच्या सर्व शाळा, खासगी शाळा व कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांचे डोळे आले असल्याचे निदर्शनास आल्यास सक्तीने सुटी देण्यात यावी.

जेणेकरून डोळे येण्याच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. शहरातील शाळांमध्ये नोडल ऑफिसरच्या माध्यमातून जनजागृती करावी.

विद्यार्थ्यांना डोळे आले असल्यास सक्तीची सुटी देऊन रुग्णालयात, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तपासणी करावी, असे आवाहन डॉ. करंजकर यांनी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लक्षणे- डोळा लाल होणे, पाणी येणे, सूज येणे, डोळ्यातून पू येणे, पापणी सुजणे, डोळा दुखणे.

डोळे आल्यास उपाय

- नेत्ररोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ड्रॉप्स सुरू करावे.

- डोळ्यास जास्त हात लावू नये व चोळू नयेत.

- डोळ्याला हात लावल्यास इतर दुसऱ्या वस्तूला हात लावू नये.

-हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

- डोळ्यास वेगळ्या रुमालाने स्वच्छ करावे.

- प्रोटेक्टिव्ह चष्मा/गॉगल वापरणे.

- शिशू, लहान मुले, रोगी, गर्भवती, वृद्ध, यांच्यापासून दूर राहणे.

- डोळे आलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

- डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT