Tortoise esakal
नाशिक

Nashik : वनविभागाकडून दुर्मिळ प्रजातीचे कासव जप्त; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील महामार्ग बसस्थानक परिसरात असलेल्या पेटशॉपमधून वनविभागाच्या पथकाने दुर्मिळ प्रजातीचे कासव जप्त केले. फेब्रुवारी महिन्यात देखील वनविभागाने शहरातील पेटशॉपमध्ये कारवाई करत अनेक दुर्मिळ कासव जप्त केले होते. त्यामुळे कासवांची विक्री थांबली होती. मात्र आता पुन्हा अशी कारवाई झाल्याने शहरात दुर्मिळ वन्यजीवांची विक्री पुन्हा सुरु झाल्याचे दिसत आहे.

पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहाय्यक गणेश झोळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने महामार्ग बसस्थानकासमोरील बुरहानी फिश अक्वेरियम दुकानावर छापा मारला. (Forest department seizes rare species of tortoise Arrested one Nashik News)

दुकानाच्या झाडाझडतीत पथकास दुकानात दुर्मिळ कासव मिळून आले. यानंतर पथकाने कासवाची अवैधरीत्या विक्री करत असल्याने दुकान चालक खोजेमा असगरअली तिन्वाला यांना अटक करून गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, हिनाली सोनवणे, रुबिना पठाण, किशोरी सानप, इको-इकोचे वैभव भोगले, अभिजित महाले आणि वाहन चालक सुनील खानझोडे आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT