crime news esakal
नाशिक

Nashik Crime : वन कर्मचाऱ्यांना जंगलात धक्काबुक्की; सुरगाणा तालुक्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : राखीव जंगलातील झाडे थेट कटरने कापत असल्याचे पकडल्याने राग आल्याने वनरक्षकाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना उंबरठा वनपरिक्षेत्रातील चापावाडी बिटाचे वन कक्ष ४२ मध्ये घडली.

वनरक्षक नवनाथ चिंतामण बंगाळ हे सकाळी नऊच्या सुमारास चापावाडी या भागात गस्तीवर असताना जंगलात कटर मशिनचा आवाज ऐकू आल्याने त्या दिशेने गेले. तेथे त्यांना कांतीलाल पांडू चौधरी, योगेश कांतीलाल चौधरी, नितीन राऊत हे अवैधरित्या सादड्याचे झाड कट्टर मशीनने कापताना आढळले. (Forest employees beaten up in forest Incidents in Surgana Taluka Nashik Crime)

याबाबत त्यांना विचारणा केली असता हे झाड आपल्या मालकीचे आहे असे त्यांनी वनरक्षकास सांगितले. वनरक्षकाने करवत ताब्यात घेत उंबरठाण येथे वनपरिक्षेत्रात कार्यालयात या असे सांगितले. त्याचा राग आला.

करवत घेऊन जात असताना रस्त्यात पाठलाग करुन करवत हिसकावून घेत धक्काबुक्की करीत दुचाकीवरून ढकलून दिले. ‘जमिनीचा सात बारा घेऊन या व मशीन घेऊन जा’ असे सांगितले असता तिघांनी धक्काबुक्की करीत तू इकडे पुन्हा जंगलात ये, तुझा बेत पाहतो’ अशी दमदाटी करीत मशीन हिसकावून घेतले.

याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडण्यास परावृत्त करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सागवानाची लागली वाट

सुरगाणा तालुक्यातील सागवानाचे लाकूड चोरट्यांनी तस्करी करीत संपवले असून आता खुंटविहीर, रानविहीर, पिंपळसोंड, तातापानी, उंबरपाडा(पि), चिंचमाळ, बर्डा या भागातील खैराच्या झाडाकडे खैर तस्करांनी मोर्चा वळवला आहे.

याबाबत वनविभागाने अधिक लक्ष देण्याची मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT