Politics
Politics esakal
नाशिक

नाशिक : नवीन गटरचनेमुळे 'कहीं खुशी-कहीं गम'; राजकीय उलथापालथ

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : आगामी पंचायत समिती (Panchayat Samiti) व जिल्हा परिषद निवडणुकांच्या (ZP Elections) पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यात एका नवीन जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीच्या दोन गणांची भर पडली आहे. मात्र, नव्या रचनेत मातब्बरांना धक्का बसणार असून अनेकांचा जिल्हा परिषद, पंचायत समितीत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एकूणच सिन्नरमधील राजकीय धामधुमीत 'कही खुशी-कही गम' चे चित्र बघायला मिळते आहे. (formation of new wards announced on forthcoming Panchayat Samiti and ZP elections Nashik News)

गट व गण संरचनेत उलटापालट झाल्याने अनेक दावेदारांची स्वप्ने भंगली आहेत. हरकतीअंती अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असली तरी प्रारूप रचनेत फारसा बदल अपेक्षित नसल्याने इच्छूकांचे घोडे गंगेत न्हाले आहेत. सिन्नरमध्ये पूर्वी सहा जिल्हा परिषद गट होते, त्यात एका गटाची भर पडली आहे. माळेगाव, मुसळगाव, सोमठाणे, पांगरी बुद्रुक, दापूर, शिवडे व नांदूरशिंगोटे असे गट नव्या रचनेत अस्तित्वात येणार आहेत. पंचायत समितीमध्ये बारा ऐवजी १४ गण राहणार असून नायगाव, माळेगाव, गुळवंच, मुसळगाव, सोमठाणे, शहा, पांगरी बुद्रुक, वावी, डुबेरे, दापुर, पांढुर्ली, शिवडे, ठाणगाव, नांदुरशिंगोटे याप्रमाणे गणांची रचना असणार आहे.

काका-पुतणीमध्ये संघर्ष?

आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा बालेकिल्ला राहिलेला पूर्वीचा शहा गट आता सोमठाणे या नावाने ओळखला जाईल. या ठिकाणी कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्यासाठी आज घडीला बालेकिल्ला अभेद्य मानला जात असला तरी कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. काका व पुतणी यांच्यातील संघर्ष सोमठाणेत बघायला मिळेल. पूर्वीच्या नांदुरशिंगोटे गटाचे विभाजन होऊन या गटातील गावे पांगरी बुद्रुक दापूर व नांदुर-शिंगोटे या नवीन गटांमध्ये विभागली गेल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाघ, विद्यमान सदस्य नीलेश केदार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. नांदूर गटाचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या पांगरी बुद्रुक गटावर आमदार कोकाटे गटाचा वरचष्मा असून वावीचे माजी सरपंच विजय काटे यांची लॉटरी जिल्हा परिषदेसाठी लागू शकते. शिवसेनेकडून या गटात बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांचे नाव आघाडीवर आहे. राजेश गडाख हेदेखील या ठिकाणी चाचपणी करू शकतात.

सांगळे दाम्पत्यांसाठी लाभदायक

पूर्वीच्या दापूर गटातून प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी जिल्हा अध्यक्ष शीतल सांगळे अथवा त्यांचे पती उदय सांगळे यांच्यासाठी नवीन दापूर गट बलस्थान करू शकतो. याच गटात डुबेरे येथील नारायण शेठ वाजे यांच्याही नावाचा आग्रह होऊ शकतो. ठाणगाव गटाचे विभाजन होऊन शिवडे, नांदुरशिंगोटे व दापुरमध्ये गावे विभागली गेल्याने ठाणगावकर असलेल्या नामदेव शिंदे यांची देखील चिंता वाढली आहे. शिवडेचे सरपंच असलेल्या कोकाटे समर्थक प्रभाकर हारक, सोनांबेचे सरपंच व वाजे समर्थक गटाचे डॉ. रवींद्र पवार यांच्यात नवीन शिवडे गटात सामना अपेक्षित मानला जात आहे. माळेगाव गटात गेल्या निवडणुकीत अवघ्या एक मताने पराभूत झालेल्या सुदाम बोडके यांना कोकाटे गटाकडून पुन्हा संधी मिळू शकते.

मुसळगावमध्ये भाऊगर्दी शक्य

मुसळगाव गटात वाजे व कोकाटे गटाकडून इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. मतदार संघाची प्रारुप रचना पूर्वी निर्धारित केल्याप्रमाणेच जाहीर झाली असून त्यावर हरकती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुदत दिली आहे. सिन्नर मधील गट गणांच्या प्रारूप रचनांवर नजर टाकली असता हरकती आल्यास तर त्या कितपत निकाली निघतील असा प्रश्न आहे. कारण भौगोलिक रचना लक्षात घेऊनच मतदार संघाचे प्रारुप रचना जाहीर करण्यात आली असून हरकती दाखल करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारे पुरावे देखील सादर करावे लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT