Vsant Gite Google
नाशिक

सत्ताधारी भाजप कडून ठेकेदारांचे लाड; माजी आमदार गीतेंचा आरोप

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना सत्ताधारी भाजपकडून ठेकेदारांचे लाड केले जात असल्याचा आरोप माजी आमदार वसंत गीते यांनी करताना अडीचशे कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाच्या कामाला अतिरिक्त ४४ कोटी रुपये वाढ देण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठेकेदार भेटला असल्यानेचं नमामि गोदा प्रकल्प राबविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

महापालिकेच्यावतीने त्रिमूर्ती चौक, मायक्रो सर्कल येथे अडीचशे कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूल साकारले जात आहे. सिमेंटच्या प्रतवारीचे निमित्त करून ४४ कोटी रुपयांची वाढ द्यावी, असे पत्र ठेकेदार यांनी महापालिकेला दिल्याने त्यावर गीते यांनी आक्षेप घेतला. उड्डाणपुलाचे प्राकलन तयार होत असताना बांधकाम विभाग झोपला होता का असा प्रश्न उपस्थित करताना वाढीव किंमत देण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला. प्राकलनात वाढ करायची असल्यास महासभा व स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प्रस्ताव जाने आवश्‍यक आहे, असा दावा करताना उड्डाण पुलांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी केला. उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या काकडे यांच्याशी कोणाशी भागीदारी आहे, याचा पर्दाफाश लवकरच करणार असल्याचा दावा करताना या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदूषणाचे पाप कोणाचे?

महापालिका निवडणुकीला अवघे सहा महिने शिल्लक राहिले असताना, सत्ताधारी भाजपला गोदावरी नदीची आठवण झाली, इतके वर्ष सत्ताधारी भाजप झोपले होते का? ३० वर्षात गोदावरी प्रदूषित करण्याचे पाप कोणी केले? पावसाळी गटार, मलनिस्सारण, पानवेली काढण्याचे कंत्राटे कुठल्या नगरसेवकाकडे होती? याबाबतची माहिती सर्वांना असून आता गोदावरी शुद्धीकरणाच्या नावाखाली विशिष्ट ठेकेदाराला कामे देण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप श्री. गीते यांनी केला.

गेल्या काही वर्षात महापालिकेमध्ये गैरप्रकारांची मालिका सुरू आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. सत्ताधारी भाजप कडून ठेकेदारांचे लाड पुरवले जात आहे.

- वसंत गीते, माजी आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT