Devidas Pingale esakal
नाशिक

नाशिक : माजी खासदार देवीदास पिंगळे अखेर निर्दोष

कृषी उपन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढीव महागाई भत्ता फरकाची रक्कम अपहार प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु होता.

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : कृषी उपन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढीव महागाई भत्ता फरकाची रक्कम अपहार प्रकरणी समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह चौघा कर्मचाऱ्यांची नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. बुधवार (ता.१३) रोजी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी पिंगळे यांच्यासह लिपिक दिनकर हिरामण चिखले, अकौटंट अरविंद जैन, स्टेनो विजय निकम या चौघांची निर्दोष मुक्तता केली. नाशिकसह अवघ्या सहकार व राजकीय क्षेत्राचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागून होते. दरम्यान, तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सत्तेचा दुरुपयोग करून राजकीय सुडबुद्धीतून माझ्यासह माझ्या कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई अखेर निष्फळ ठरली. न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आणि अखेर सत्याचाच विजय झाला, अशी प्रतिक्रिया माजी खासदार पिंगळे यांनी निकालानंतर व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT