Crime News
Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : गाळ्याला भगदाड पाडून रंगाचे डब्बे चोरणाऱ्या चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अंबड हद्दीतील चुंचाळे शिवारात शॉपिंग सेंटरमधील गाळ्याच्या पाठीमागे भगदाड पाडून रंगाचे डब्बे व साहित्य चोरी करणार्या चौघांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल आहे.

कृष्णा राजेंद्र गाडे, गौरव रमेश गाडे, रमेश काशिनाथ गाडे, सुजाता कैलास गाडे असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. (Four arrested for stealing paint boxes by vandalizing street Nashik Crime News)

माणिकराव निवृत्ती सोनवणे (रा. प्रियंका हिल, महात्मानगर, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, अंबड लिंक रोडवरील चुंचाळे शिवारातील लक्ष्मण टाऊनशिपमध्ये शुभम शॉपिंग सेंटर असून, यातील १३ आणि १४ क्रमांकांचे गाळे सानेवणे यांचे आहेत.

यातील १४ क्रमांकाच्या गाळ्याला पूर्वेच्या बाजूने एक मोठे भगदाट पाडून संशयित चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसेच, गाळ्यात असलेले १५ हजार रुपयांचे सिलबंद रंगाचे डब्बे, ३ हजार रुपयांचे सिमेंटच्या गोण्या,१० हजार रुपयांची पिओपीच्या गोण्या व १५ हजार रुपयांचे लिफ्टचे सामान चोरू नेले.

याप्रकरणी अंबड पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक नईद शेख हे तपासर करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होणार? मोदींच्या हॅट्रिकबद्दल प्रशांत किशोर यांची मोठं भाकित

SBI Chairman Interview: SBI चेअरमन पदाची मुलाखत अचानक रद्द, काय आहे प्रकरण?

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

SCROLL FOR NEXT