nashik drone 123.jpg 
नाशिक

"गो कोरोना गो'! आरडाओरडा करत "त्यांचा' ड्रोन उडाला हवेत....अन् मग...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5) रात्री 9 वाजेपासून 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत दिवे लावण्याचे आवाहन केले होते. कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हे आवाहन करण्यात आलेले होते. त्यानुसार नाशिक शहरात ठिकठिकाणी दिवे लावण्यात आले. परंतु याहीवेळी काही अतिउत्साही नागरिकांनी त्याचा गैरअर्थ घेतल्याचे दिसून आले. 

"गो कोरोना गो...पडले महागात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देताना, पखाल रोडवरील अपार्टमेंटसमोर हवेत ड्रोन उडवून "गो कोरोना गो'च्या घोषणाबाजी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे. तर दुसरीकडे अंबड-सिडको परिसरातही मोठ्याप्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी करतानाच काही ठिकाणी जमावाने येत घोषणाबाजी केल्याचे अनेक प्रकार घडलेले असतानाही याबाबत एकही गुन्हा अंबड पोलिसात दाखल नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे. 

ड्रोनला मोबाईल फोनही जोडला
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पखाल रोडवर निलोफर अपार्टमेंट आहे. मुंबई नाका पोलिसांचे रात्रीचे गस्तीपथकातील बिटमार्शल किशोर सूर्यवंशी, आप्पा पानवळ हे गस्तीवर असताना, या निलोफर अपार्टमेंटच्या समोर सार्वजनिक ठिकाणी संशयित राहुल आनंदा पेखळे, सुमित संजय कोरपड, प्रथमेथ सुरेश निचळ, किरण अशोकराव विंचूरकर (सर्व रा. निलोफर अपार्टमेंट, सप्तशृंगी कॉलनी, पखाल रोड, नाशिक) हे चौघे विनापरवानगी जमा होऊन "गो कोरोना गो' अशी जोरजोरात आरडाओरडा करीत घोषणाबाजी देत होते. तसेच, त्यांनी हवेमध्ये ड्रोन कॅमेरा उडविला. या ड्रोनला त्यांनी मोबाईल फोनही जोडला होता. गस्ती पथकाने ड्रोनसह मोबाईल जप्त केला आणि चौघांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त अमोल तांबे, मुंबई नाक्‍याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ हे दाखल झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का
 
अंबड पोलिसांचे मात्र दूर्लक्ष 
दरम्यान, अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिडको, अंबड, केवळपार्क या परिसरात मोठ्याप्रमाणात रस्त्यावर उतरून घोषणाबाजी आणि फटाक्‍यांची आतषबाजी करण्यता आले. परंतु यासंदर्भात एकही गुन्हा अंबड पोलिसात दाखल झालेला नाही. त्यामुळे अंबड पोलिसांचे गस्तीपथक रस्त्यावर होते की नाही याबाबतच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीचा आईनेच काढला काटा; मृतदेहासमोरच प्रियकरासोबत...

Raj Thackeray : ‘माझ्यावर सोडा, सर्व मनासारखं होईल’; युतीवर राज ठाकरे यांचा दिलासा

Open Heart Surgery : कोण म्हणतं कोल्हापूरचं सीपीआर रुग्णालय चांगलं नाही, दोन लहान मुलांवर हृदयशस्‍त्रक्रिया केली यशस्वी

Parbhani : पुण्याहून परभणीला निघालेल्या बसमध्ये प्रसूती, बाळाला खिडकीतून फेकलं; १९ वर्षीय तरुणीसह तरुणाला अटक, काय घडलं?

ENG vs IND: इंग्लंडचे पहिले पाढे पच्चावन्न! लॉर्ड्स कसोटी जिंकली, पण केली मोठी चूक; आयसीसीने WTC मधील पाँइंट्सच कापलं

SCROLL FOR NEXT