Meat Sellers
Meat Sellers esakal
नाशिक

Nashik News : शहरात साडेचारशे अनधिकृत मांस विक्रेते

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मांसविक्री करण्यासाठी महापालिकेचा परवाना बंधनकारक आहे. परंतु, शहरात अद्यापही साडेचारशे मांसविक्रेते अनधिकृत व्यवसाय करत असल्याची बाब महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

महापालिका हद्दीत २५५ विक्रेत्यांनी परवाना घेतला आहे. शहरात अनेक भागात मांसविक्री होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्याच्या सूचना महासभेत सदस्यांनी केल्या होत्या. (Four half hundred unauthorized meat sellers in city Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तत्कालीन सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार शहरात उघड्यावर मांस विक्री करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. महापालिकेकडून मांस विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

त्यात ७२८ मांस, मासळी विक्रेते असल्याचे निष्पन्न झाले होते. मांस विक्रेत्यांना अधिकृत व्यवसाय परवाना बंधन करण्यात आले. आतापर्यंत २५५ मांस विक्रेत्यांनी व्यवसाय परवाना प्राप्त केला आहे. परवाना न घेतलेल्या साडेचारशेहून अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.

कारवाई करताना मांस विक्रीचा परवाना नसल्यास प्रथम पाचशे रुपये दंड, त्यानंतर अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पूर्व विभागात १७८, सिडको विभागात १५०, पंचवटी विभागात १४५, नाशिक रोड १४३, सातपूर ९८, पश्चिम १३ या प्रमाणे परवानाधारक मांस विक्रेते आहेत. अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT