jhadi.jpg 
नाशिक

नेहमीप्रमाणे शेतात जाण्यासाठी निघाले चौघे; मात्र वाटेत जे घडले ते थरारकच

अमोल खरे

नाशिक : (मनमाड) हिसवळ बुद्रुक गावामध्ये शेतात जाणाऱ्या चार जणांसोबत धक्कादायक घटना घडली. झाडाझुडपातून त्याने अचानक झडप घातल्याने ते चोघेही गांगारून गेले. अन् नंतर घडले असे...

अशी आहे घटना

शनिवारी (ता. 31) मीना आहेर (वय-45), सुनीता पवार(वय 35), जगन आहेर(वय 65) आणि मोहन सोळसे(वय 30) हे चारही जण रस्त्याने शेतात जात असतांना झाडाझुडुपांमध्ये लपून बसलेल्या लांडग्यांने त्यांच्यावर हल्ला केला. लांडग्यांने केलेल्या हल्ल्यामुळे हे चारही जण गांगरून गेले असले तरी या चौघांनी आरडाओरडा केला. जोरजोरात आवाज झाल्याने लांडगा पळून गेला. त्यानंतर आरडाओरडा ऐकू आल्याने लगतची काही तरुण मंडळींनी घटनास्थळी आले. तोपर्यंत लांडगा पसार झाला होता. जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी डी.बी.बोरसे, डी.जी.सुर्यवंशी, सी.इ.भुजबळ, अशोक सोनावणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. मनमाडसह नांदगाव तालुक्यात वनविभागाचे मोठे जंगल असुन त्यात हरीण, मोर, ससे, लांडगे यासह इतर वन्यप्राणी असुन गावात येवून लांडग्यांने लोकांवर हल्ला केल्याची या भागात ही पहिलीच घटना मानली जात आहे. या घटनेमुळे हिसवळ परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT