crime news esakal
नाशिक

नाशिक रोडला पिस्तूलधारी सराईतांची चौकडी जेरबंद

विनोद बेदरकर

नाशिक : पिस्तूल घेवून कारमध्ये फिरणाऱ्या चौकडीस पोलीसांनी (police) बेड्या ठोकल्या आहेत. संशयित पोलीस रेकॉर्डवरील (police record) सराईत गुन्हेगार असून त्यांच्या ताब्यातून कारसह चार पिस्तूल आणि काडतुसे असा सुमारे २१ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.(Four suspected with pistols arrested on Nashik Road marathi news)

नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल संदीप सोनार (२९ रा.स्वप्निल सोसायटी.जयभवानी रोड), सागर किसन कोकणे (२१ रा.निवारा दर्शन,हनुमान चौक चेहडी पंपीगरोड),दर्शन उत्तम दोंदे (२३ डॉ.आांबेडकर पुतळ््याजवळ राजवाडा कामटवाडा) व प्रशांत नानासाहेब जाधव (२४ रा.केश्व लक्ष्मी अपा.जाधवमळा,दे.गाव) अशी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीताची नावे आहेत. युनिट १चे कर्मचारी राहूल पालखेडे यांनी तक्रार दाखल केली आहे. जयभवानी रोडवरील फर्नांडीसवाडी भागात मंगळवारी रात्री कारमधून पिस्तूलधारी तरूण येणार असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शानाखाली सापळा लावला.

स्वप्निल बिल्डींग परिसरात पोलीसांनी (एमएच १५ सीएच ९३९२) ही फॉर्च्युनर कार अडवून तपासणी केली असता कारमधील गुन्हेगार असलेल्या संशयीतांकडे विनापरवाना चार गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मिळून आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT