A four-team system of the forest department is equipped with sophisticated weaponry to catch the man-eating leopard after it unleashes its rampage.  esakal
नाशिक

Nashik Leopard Attack : नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा अन्यथा.... वन विभागाचे जवान तैनात!

ज्ञानेश्वर गुळवे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Leopard Attack : एखाद्या युद्धभूमीवर लष्कराचे जवान जसे सज्ज होतात तशीच काही सज्जता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद, बाह्मणवाडे, शिरसगाव, धुमोडी, गणेशगाव,तळवाडे या गावामध्ये सद्या बघायला मिळत आहे. (four team system of forest department is ready with weapons to catch leopard nashik news)

दोन चिमुकल्या मुलींना ठार करुन उच्छाद मांडणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी अशी पंचवीस ते तीस जणांची कुमक गेल्या आठ दिवसांपासून डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.

तीन ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेतला जात असून सतरा ठिकाणी अद्यावत असे पिंजरे बसवण्यात आले आहे. २५ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहे. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा उभारल्याने वरील परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

बिबट्याची भीती कमी होण्यास मदत झाली आहे यंत्रणा कमालीची सज्ज असतानाही अद्याप बिबट्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. तप्त उन्हात आणि अवकाळीच्या वातावरणातही वन खात्याने हार मानलेली नाही. नेटाने निगराणी चालू ठेवल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या सुळसुळाटाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांच्या जोरदार तक्रारीने वन खात्याचे तसेच वन मंत्र्यांचे दरवाजे ठोठावल्याने वरील यंत्रणेची सज्जता झाली आहे. जवळपास वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात चौघे बालक बळी गेले होते. आठवड्यात पिंपळद येथे बालिकेचा बळी गेल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार उठाव केला होता.

बिबट्याला जेरबंद किंवा ट्रॅक्युलाईज करा प्रशासनाचे आदेश

नरभक्षक बिबट्याला पिंजऱ्यात कैद करा किंवा टॅक्यूलाईज करण्याचे जिल्हाप्रशासनाचे आदेश आहे. जर दोन्हीही पर्याय फसल्यास शूटआउटचा पर्याय असल्याने तीन दिवसात बिबट्या जेरबंद न झाल्यास अगर गनने बेशुद्ध न झाल्यास शूटआउटच्या आदेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्र्यंबकेश्वर वन विभागाचे जवान आणि इको फौंडेशनचे स्वयंसेवक तळ ठोकून आहेत.

सद्यस्थितीत चार पथके बिबट्याचा शोध घेत आहेत. सहा एप्रिलपासून वन अधिकारी कर्मचारी तळ ठोकून आहेत. इथेच त्यांनी आपला तंबू ठाकला आहे. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी एक्स कॅलिबर, न्यूडार्ट टेली इंजेक्ट या बंदुका,ब्लो पाईप सज्ज आहे, तर स्वरक्षणासाठी SLR 9 MM गन ही ठेवण्यात आली आहे. बिबट्याला शूट आऊट करण्याची मागणी यापूर्वी झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT