A four-wheeler found in a fire. esakal
नाशिक

Nashik News : अंकाई फाट्यानजीक चारचाकी वाहनास पेट!

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : प्रवासी वाहतूक करताना जाणाऱ्या व शिर्डीकडे जात असलेल्या टाटा मॅजिक या गाडीने अचानक पेट घेतला. मनमाड येवला रोडवर अंकाई फाट्याजवळ ही घटना घडली. गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून ८ प्रवाशांना उतरविले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. आगीत गाडी जळून खाक झाली. (Four wheeler caught fire near Ankai Fata Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

मनमाड रेल्वे स्थानकातून शिर्डीसाठी ७ ते ८ प्रवासी घेऊन टाटा मॅजिक ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी मनमाडकडून शिर्डीकडे भरधाव निघाली. मनमाडहून गाडी निघाली असता मनमाड येवला रस्त्यावर अंकाई फाट्याजवळ रस्त्याने जात असताना गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.

गाडीत काही तरी बिघाड झाला असावा किंवा गाडी जास्तच गरम झाली असावी त्यामुळे गाडी पेट घेऊ शकते हे लक्षात आले असता, चालकाने प्रसंगावधान दाखवत अंकाई फाट्याजवळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून उभी करत गाडीत बसलेले सर्व प्रवासी तातडीने उतरवून देऊ त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.

चालकाने गाडीखाली उतरून पाहणी करीत असताना इंजिनमध्ये आग लागली. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आगीची माहिती मिळताच मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत आग विझविली. सर्व प्रवासी उत्तर प्रदेश येथून रेल्वेने मनमाडला आले व मनमाड येथून शिर्डी येथे खासगी वाहनाने जात असताना ही दुर्घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT