Arson of a four-wheeler by the suspects due to a dispute over installment recovery esakal
नाशिक

Nashik Crime News : शालिमार भागात हप्ते वसुलीसाठी चारचाकीची जाळपोळ

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक (जि. नाशिक) : शालिमार भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने संशयितांकडून चारचाकीची जाळपोळ केली. हप्तेगिरी घेण्यावरून प्रकार घडल्याचे तक्रारदार याने तक्रारीत नमूद केले. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Four wheeler set on fire for installment recovery in Shalimar area Nashik Crime News)

सदर घटना रविवारी (ता.१२) मध्यरात्री घडली. तक्रारदार दीपक कपिले चारचाकीत (एमएच- १५- एएस- १३३८) नेहरू गार्डन समोर शालीमार भागात खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान चालवतात. व्यवसाय झाल्यानंतर चारचाकी जिमखाना येथील पार्किंगमध्ये पार्क करतात.

रविवार नेहमीप्रमाणे त्यांनी पार्किंगमध्ये चारचाकी उभी केली. संशयित घाऱ्या पूर्ण नाव समजू शकले नाही. त्याच्या अन्य तीन ते चार सहकाऱ्यांनी मिळून रात्री एक ते दीडच्या सुमारास चारचाकीची जाळपोळ केली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यात संपूर्ण चारचाकी आणि दुकानाचे साहित्य जळून राख झाले. भद्रकाली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. अग्निशामक विभागास माहिती देण्यात आली. अग्निशामक बंबही काही वेळात घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत संपूर्ण चारचाकी जळून भस्मसात झाली होती.

संशयित तक्रारदाराकडून नेहमी पैसे घेऊन जात होते. रविवारी त्यांनी अधिक पैशाची मागणी केली. त्यांनी नकार दिल्याने रात्री उशिरा राग मनात धरून दुकान असलेल्या चारचाकीची जाळपोळ केली. असे तक्रारीत नमूद करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT