The unused fourth platform of the railway station. esakal
नाशिक

Nashik News : रेल्वे स्टेशनचा चौथा फलाट वापराविना; तांत्रिक अडचणीमुळे फलाट नावापुरता!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : कुंभमेळ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक वर्षानंतर नाशिक रोड रेल्वेस्टेशनमध्ये चौथा फलाट बांधण्यात आला. त्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्याचा वापरच होत नसल्यामुळे ही गुंतवणूक वाया गेल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. (Fourth platform of railway station unused Due to technical difficulties platform called Nashik News)

रेल्वेस्थानकात पूर्वी तीन फलाट होते. कुंभमेळ्यापूर्वी चौथा फलाट तयार करण्यात आला. तो मुख्य स्थानकाला जोडण्यासाठी भव्य पादचारी पूल, रॅम्पही उभारण्यात आला. मात्र त्याचा अतिशय अत्यल्प वापर होत असून करोडो रुपयांचा निधी खर्च करून उभा केलेला चौथा फलाट पुरेपूर वापरला पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

चौथा फलाट होण्याआधी लगतच असणाऱ्या सिन्नर फाटा भागात प्रचंड अतिक्रमणे होती. ती हटवून फलाटाकडे येण्याचा रस्ता करण्यात आला.

त्यामुळे या भागाचा विकास झाला. कुंभमेळ्यात सिन्नर फाटा रस्ता बांधण्यात आला. सध्या प्लॅटफॉर्म चारजवळ तिकीट विक्री केंद्र, पार्किंग, निवारा शेड आदी सुविधा आहेत.

गैरप्रकार सुरू

चौथ्या फलाटावर सर्व सुविधा असतानाही त्याचा वापरच केला जात नाही. त्यामुळे हा गरीब, भटक्या लोकांचे आश्रयस्थान झाला आहे. येथे रात्री मद्यपी बसतात. अन्य गैरप्रकारही सुरु असतात. वापरच होत नसल्याने नियमित स्वच्छताही केली जात नाही.

पथदीपही अनेकदा बंद असतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरील वाहने आणि प्रवाशांची गर्दी कमी व्हावी आणि सिन्नर फाटा भागातून प्रवाशांना प्रवेश मिळावा, हा चौथ्या फलाटाचा खरा उद्देश होता.

नागरिक सिन्नर फाटा लांब पडतो म्हणून त्या प्रवेशद्वारातून येतच नाहीत. या ठिकाणी आरक्षण कार्यालय झाल्यामुळे थोडीशी वर्दळ वाढली आहे. चौथा फलाट शो-पीस झाला आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

या आहेत अडचणी

चौथा फलाट सर्वात जास्त लांब म्हणजे ६२० मीटरचा आहे. एक नंबर ५४०, दोन नंबर ६३० तर तीन नंबर ६१० मीटर लांबीचा आहे. या सर्व फलाटावर २६ डब्यांची रेल्वे गाडी उभी राहू शकते. सध्या चौथ्या फलाटावर रोज सहा ते आठ प्रवासी गाड्या थांबतात.

चौथ्या फलाटावर गाड्या नेण्यात कमी जागेमुळे अडचणी येते. लूप लाईनमधून गाडी नेताना जास्त वेळ जातो. या टर्न आऊटसाठी सुमारे आठ मिनीटे लागतात. रेल्वेने घालून दिलेले वेळ व सुरक्षेचा निकष पाळणे अवघड जाते.

सिन्नर फाट्यावरील जुना पूल म्हणजेच रोड ओव्हर ब्रीज ही दुसरी महत्त्वाची अडचण आहे. हा पूल मुख्य रेल्वेमार्गाला लगत आहे. त्यामुळे येथे गाडी ताशी ५० किमीपेक्षा जास्त वेगाने नेता येत नाही. फ्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर गाडी वेगात येऊन थांबू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : दौंड–इंदापूरमध्ये बनावट मद्याचा भंडाफोड; तीन लाखांचा साठा जप्त; तीन तरुणांना अटक!

Latest Marathi News Update LIVE : ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा

Sangli News: नाराजांसह बंडाची तयारी करणाऱ्यांची मनधरणी सुरु; ‘पॅचअप’साठी बैठकांचे सत्र; अनेक नाराजांकडून पक्षांतराची घोषणा

Balapur Crime : तुरीच्या शेतात धक्कादायक घटना: जळालेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडताच परिसरात खळबळ!

Ichalkaranji News: इच्छुकांची धाकधूक वाढली; महापालिका निवडणुकीची अनिश्‍चितता, हालचालींना ब्रेक

SCROLL FOR NEXT