Online payment fraud esakal
नाशिक

Phone Pay चा दाखवला खोटा मेसेज; सराफाला 63 हजारांना गंडा

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूचे पैसे ऑनलाईन (Online payment) फोन पेद्वारे देतो असे सांगत फोन पे (PhonePe) केल्याचा बनावट मॅसेज दाखवून दोन भामट्यांनी वणी येथील सराफ व्यावसायिकास गंडा घातला आहे. दुकानातात असलेल्या सीसीटीव्ही व जवळपासच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी घेतले आहे.

''रोकड नाहीेये आम्ही फोन पे करणार'' आणि...

वणी शहरातील शिंपी गल्लीतील सौभाग्य जैन ज्वेलर्स नावाचे संजय मांगीलाल जैन यांचे दुकान असून मंगळवारी (ता.२१) दुपारी एकच्या सुमारास दुकानात ३० ते ३५ वयोगटातील दोन अनोळखी व्यक्ती स्कुटीवरुन आल्या. त्यांनी दुकानातील सोन्या चांदीच्या वस्तू बघत ६.६३ व ४.६० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच ५७.८०० ग्रॅम वजनाची चांदीचे पैजण असे एकूण ६३ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले. त्यांनी आमच्याकडे रोख पैसे नसल्याने आम्ही फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट करीत असल्याचे सांगत त्यांनी त्याचा मोबाईल क्रमांक ७०४१८१५७४४ या क्रमांकाचे फोन पे वरुन, फिर्यादीचा भाऊ मयूर जैन यांचा फोन पे क्रमांक ८८०५६४७०४४ यावर ६३,५००/-रुपये फोन पे ने ऑनलाईन टाकल्याचा बनावट मॅसेज टाकला. पैसे पे केल्याचा मॅसेज फिर्यादीस दाखवून खरेदी केलेल्या वस्तू घेत स्कुटीवरून फरार झाले.

मॅसेज वरचेवर बघितला अन् झाला घात

ज्यांच्या नंबरवर फोन पे केले ते मयूर जैन हे बाहेरगावी असल्याने त्यांनी फोन पे सक्सेसचा मॅसेज आल्याने त्यांनी मॅसेज गर्दीत वरचेवर बघितला. त्यानंतर त्यांनी खात्यात पैसे जमा झाले, की नाही याबाबत मॅसेज नंतर दहा पंधरा मिनिटांनी खात्री केली असता, पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा न झाल्याचे दिसले. त्या व्यक्तिंनी पाठवेला फोन पे चा मॅसेज बनावट असून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. याबाबत संजय जैन यांनी वणी पोलिसांत आज (ता.२२) दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुकानातात असलेल्या सीसीटीव्ही व जवळपासच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT