debit card
debit card 
नाशिक

सावधान! हॅकर्स झाले सक्रीय.. बँक खात्यातील चक्क पावणेचार लाखांवर डल्ला

विनोद बेदरकर

नाशिक : डेबिटकार्डचे क्लोनिंग करून तीन बँक खात्यातील पावणेचार लाखांवर हॅकरने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना स्टेट बँकेच्या शिवाजीनगर शाखेत घडली. या प्रकरणी सायबर पोलिसांत फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर शाखेचे व्यवस्थापक अनिल ढोले यांच्या तक्रारीनुसार, १७ ऑगस्ट २०१८ ते २ ऑगस्ट २०१९ यादरम्यान भामट्यांनी तीन बँक खातेदारांच्या डेबिटकार्डचा डाटा चोरून क्लोनिंगद्वारे वेगवेगळ्या एटीएममधून व ऑनलाइन अशी सुमारे तीन लाख ८२ हजारांची रोकड परस्पर काढून बँक आणि ग्राहकांची फसवणूक केली.

१८ लाखांच्या एलइडी आणि वातानुकूलित यंत्र लंपास
तिगरानिया रस्त्यावरील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे गुदाम फोडून १८ लाखांचे एलइडी आणि वातानुकूलित यंत्र लंपास करण्यात आल्या.मुंबई येथील परेश मदानी आणि तुषार अवलानी यांची मॅट्रिक्स डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड नावाची संस्था आहे. त्यांच्याकडून जिल्ह्याच्या विविध भागांत इलेक्ट्रॉनिक्स दुकानास टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्रांचा पुरवठा करण्यात येतो. त्यांचे शहरातील तिगरानिया कंपनी रस्त्यावर गुदाम आहे. बुधवारी (ता. २२) मध्यरात्री गुदामाचे शटर तोडून एलइडी टीव्ही, एसीची व २६ हजारांची रोकड असा सुमारे १८ लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. संशयितांनी चोरी करण्यापूर्वी गुदामाबाहेरील सीसीटीव्ही उलट्या दिशेला फिरवून दिला. दुसऱ्या कॅमेऱ्यावर कापड टाकून त्याची तार कापून तो निकामी केला.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT