Fraud crime news esakal
नाशिक

बँकेत तारण प्लॉट परस्पर नावावर करून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बँकेकडे तारण असलेल्या दोन प्लॉटवर एका संशयिताने बँकेचे अधिकाऱ्यांशी संगनमत करून सदरील प्लॉट परस्पर बँकेकडून खरेदी करीत फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. (Fraud in bank by making plot in mutual name Nashik Latest Crime News)

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित प्रेम जगुमल कारडा याच्यासह इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशुतोष रघुनाथ राठोड (रा. राजराजेश्वरी चौक, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, राठोड यांनी पंचक शिवारात दोन प्लॉटवर युनियन बँकेकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

राठोड यांनी मुदतीत कर्ज फेडले नव्हते. दरम्यान, जानेवारी २००३ ते नोव्हेंबर २००७ या कालावधीत संशयित कारडा याने कॉलेज रोडवरील युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून खोटे व बनावट कागदपत्र तयार करून सदरची मालमत्ता बँकेकडून खरेदी करीत राठोड यांची फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT