job.jpg 
नाशिक

रेल्वेत नोकरीच्या अमिषाने मामा-भाच्याला १८ लाखांना गंडा

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगत बनावट ऑर्डर तयार करून नाशिकमध्ये मामा-भाच्याची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय घडले नेमके?

रेल्वेत नोकरीच्या अमिषाने मामा-भाच्याला १८ लाखांना गंडा

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहर वाहतूक शाखेत कार्यरत रमेश मोतीगिरी गोसावी ( रा. नाशिक) आणि सचिन भाऊसाहेब म्हस्के (रा. वैजबाभूळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) या दोघा संशयितांनी १ नोव्हेंबर २०१४ ते १२ मे २०१६ या दरम्यान बाबाजी रामजी केदारे (रा. हनुमाननगर, पंचवटी) आणि त्यांचा भाचा स्वप्निल महेंद्र बागूल यांना रेल्वेत नोकरी लावून देतो, असे अमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.

पंचवटी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल

'इस्टर्न रेल्वे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया' या नावे 'टीसी' या पदाची बनावट ऑर्डर तयार करून ती खरी असल्याचे भासवत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी प्रत्येकी ९ लाख असे एकूण १८ लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी संशयितांकडे दिलेल्या रकमेची वेळोवेळी मागणी केली, मात्र नेहमी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने अखेर बाबाजी रामजी केदारे यांनी पंचवटी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. शिंदे पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकार! कपडे बदलताना महिलेचे CCTV त चित्रीकरण; दुकान मालक अटकेत

आशिष नेहराची लाईव्ह सामन्यात शुभमन गिलला शिवी; DC vs GT सामन्यात बरेच काही घडले Video Viral

Stock Market Today:युद्ध थांबलं तरी शेअर बाजार घसरला! काय आहे कारण? TCS चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीबाबत वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT