fraud.jpg 
नाशिक

धक्कादायक! सिमकार्ड फोर-जी करण्याचे नाव...अन् थेट लाखाचा लावला चुना...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : तुम्हाला तुमचे मोबाईलचे सीमकार्ड फोर-जीमध्ये ऍक्‍टिव्हेट करून घ्यायचं का?..मी करुन देतो म्हणत त्याने केला असा धक्कादायक प्रकार...ऑनलाईन पद्धतीने गुपचूप केले असे काही की...

अशी आहे घटना

राकेश सुखदेव आहेर (रा. आनंदघन कॉलनी, बुरकुले हॉलमागे, सिडको, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना सोमवारी (ता. 1) दुपारी दीड वाजता अज्ञात संशयिताने फोन केला आणि त्याचे आयडिया कंपनीचे मोबाईल सीमकार्ड फोर-जीमध्ये ऍक्‍टिव्हेट करून देण्याचे आमिष दाखविले. राकेश यांना विश्वासात घेऊन तो खरच सिमकार्ड फोर-जी करुन देणार अशी त्यास भूल देऊन संशयिताने त्यांच्या आयसीआयसीआय बॅंकेच्या खात्यातून रोकड आणि त्यांच्याच नावे पर्सनल लोन मंजूर करीत तब्बल आठ लाख 49 हजार 578 रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी सायबर पोलिसात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे हे तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

Korean Peninsula Tensions: किम जोंग यांची हत्या झाल्यास अण्वस्त्र हल्ला; उत्तर कोरियाने स्वीकारले नवे धोरण

IPL 2026 : दिल्लीने पंजाबला हरवलं, पण कर्णधार अक्षर पटेलला BCCI ने सुनावली शिक्षा; नेमकी काय झाली चूक?

Maharashtra Cost Cutting Rules : महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT