fraud crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: उद्योजकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक; बँकेशी तडजोडीचे आमिष दाखवून घातला गंडा

याप्रकरणी पंचवटी पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाकामी गुन्हा आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉटवर बँकेचे कर्ज असताना त्याची खरेदी करणार्या उद्योजकाला तारण कर्ज लिलावाच्या माध्यमातून कमी किमतीतील खरेदी करण्याचे आमिष दाखवून भामट्याने तब्बल १ कोटी २७ लाख ६५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाकामी गुन्हा आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. (Fraud of an entrepreneur worth crore fraud done by showing bait of compromise with bank nashik crime)

ललित शशिकांत निकम (रा. इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे. भाऊसाहेब ठारसिंग गिरासे (रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, मार्च २०२२ मध्ये त्यांनी भुपेंद्रसिंह शेखावत, नवदीपसिंह शेखावत यांच्याकडून प्लॉट विकत घेण्याचा व्यवहार केला.

पंजाब नॅशनल बँकेकडे सदरचा प्लॉट तारण होता. त्याची थकबाकी भरण्यासंदर्भात गिरासे यांनी चौकशी केली असता, लिलावामार्फत खरेदी केल्यास कमी किंमतीत मिळेल असे समजले.

याचदरम्यान त्यांनी संशयित ललित निकम याच्याशी ओळख झाली. निकम हा लिलावातील मिळकती बँकेशी मध्यस्थी करून कमी किमतीमध्ये मिळवून देण्याचे काम करीत असल्याचे सांगत त्याने गिरासे यांचा विश्वास संपादन केला.

त्यासाठी गिरासे यांनी विश्वासाने प्लॉटचे कागदपत्रे संशयित निकम यास दिले. निकम याने यापोटी गिरासे यांच्यावर १७ जुलै २०२२ ते २१ मार्च २०२३ या दरम्यान १ कोटी २७ लाख ६५ हजार रुपये घेतले.

त्यानंतर संशयित निकम याने गिरासे यांना सदरचा प्लॉट १ कोटी ५८ लाख ३० हजार रुपयांत निश्चित केल्याचे बँकेचे पत्र दिले. परंतु त्याने काही कागदपत्रे ही व्हॉटसॲपवर दिली. त्याचा गिरासे यांना संशय आला.

त्यांनी याबाबत प्रत्यक्ष बँकेकडे चौकशी केली असता, त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. निकम याने बँकेकडे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नव्हती.

त्यानंतर गिरासे यांनी संशयित निकम याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने टाळाटाळ केली. तसेच सध्या तो शहरातून फरार झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT