fraud crime news esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : रोलेट प्रकरणी एकाची साडेचार लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ऑनलाइन रोलेट खेळून त्या माध्यमातून दामदुप्पट पैसे मिळण्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल साडेचार लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी संबंधित युवकाने पोलिसात तक्रार केली आहे. परंतु, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. (Fraud of four and half lakh in roulette case fraud crime nashik)

अनिकेत प्रवीण निकाळे (रा. मल्हार खान, गंगापूर रोड) या युवकाच्या तक्रार अर्जानुसार, गेल्या ७ मार्च २०२३ ला त्यास विद्या विकास सर्कलजवळ संशयित सूरज शहा, पवन शहा हे भेटले. त्यांनी ऑनलाइन रोलेट गेमच्या माध्यमातून दामदुप्पट पैसे कमविण्याचे आमिष दाखविले.

तसेच, रोलेट गेमसाठी आयडी घेण्यासाठी निकाळे याच्याकडून दोन लाख रुपये डिपॉझिट घेतले. त्यानंतर या गेमच्या माध्यमातून कमिशनही मिळेल असेही सांगितले. त्यानंतर निकाळे याने वारंवार गेम खेळण्यासाठी पैसे टाकत गेला. परंतु त्याचे पैसे दुप्पटही झाले नाहीत आणि त्याला कमिशनही मिळाले नाही.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

याबाबत त्याने संबंधितांकडे चौकशी केली असता, पैसे मिळतील म्हणून पुन्हा पैसे भरण्यास लावले. त्यामुळे निकाळे याने पुन्हा पैसे भरले. परंतु तोच अनुभव आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला. परंतु, अद्यापही याप्रकरणी गुन्हा झालेला नसल्याचे निकाळे याचे म्हणणे आहे. तरी या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन संबंधितांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT