senior-citizen 1234.jpg 
नाशिक

भामट्याचा वृद्धाला गंडा; बॅंक खात्यातून परस्पर काढले ६८ हजार रुपये

यूनुस शेख

नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या बॅंक खात्यातून सुमारे ६८ हजार रुपये परस्पर काढल्याचा प्रकार रविवारी (ता. ३) उघडकीस आला. भद्रकाली पोलिसांत संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

काय घडले नेमके?
हबीब बेग मोगल बेग मिर्झा (वय ६९, रा. अशोका मार्ग) गुरुवारी (ता. ३१) शिवाजी रोडवरील एटीएम केंद्रात रक्कम काढण्यासाठी गेले. त्यात पैसे नसल्याने ते द्वारका येथील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी दोन ते तीन वेळा प्रयत्न करूनही रक्कम निघाली नाही. त्यांच्या मागे असलेल्या तरुणाने रक्कम काढून देण्याचा बहाणा करत त्यांचे कार्ड स्वत:कडे घेऊन पैस काढून देत असल्याचे भासविले. एटीएम यंत्राचे कीबोर्ड नादुरुस्त असल्याचे सांगून त्यांना शेजारीच बँकेची शाखा आहे. तेथे जाऊन चौकशी करण्यास सांगितले. ते बॅंकेत गेले असता, त्यांच्या मोबाईलवर १० ते १५ मिनिटांत २९ हजार ३८ रुपयांची रोकड आणि ३९ हजार ९२९ हजारांची एटीएम कार्डद्वारे खरेदी असे एकूण ६८ हजार ९६७ हजारांची रक्कम काढल्याचे संदेश आले.

पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड ताब्यात

रक्कम काढली किंवा खरेदी केली नाही, तरी रक्कम काढल्याचे संदेश आल्याने वृद्धास धक्का बसला. काही वेळ विचार केल्यानंतर त्यांनी एटीएम कार्ड बारकाईने बघितले. त्यांच्या लक्षात आले, की त्यांच्याकडे असलेले कार्ड त्यांचे नाही. गुरुवारी (ता. ३१) रक्कम काढण्यासाठी एटीएममध्ये गेलो असताना, तरुणाने पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्याचे एटीएम कार्ड त्याच्याकडे घेतले होते. त्यानंतर त्याने नजर चुकवून कार्ड आदलाबदल करून बनावट कार्ड दिल्याचे समजले. त्यांनी भद्रकाली पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

Pune Toxic Liquor: पुणे-पिंपरीतील विषारी दारूकांडाचा उगम उरुळीकांचन? स्थानिक तरुणाचा मृत्यू, भेसळ रॅकेटवर संशय तीव्र

SCROLL FOR NEXT