fraud job.jpg 
नाशिक

''मुलाला नोकरीला लावून देतो'' म्हणत लावला लाखोंचा चुना; पोलिसांत गुन्हा दाखल

विनोद बेदरकर

नाशिक : ''मिलिटरी इंजिनिअरींग येथे मुलाला नोकरी लावून देतो'' म्हणत थोडेथिडके नव्हे तर तब्बल साडेसहा लाखांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर प्रकार

अशी आहे घटना

मिलिटरी इंजिनिअरींग येथे मुलास नोकरीस लावण्याचे आमिष दाखवत एकाने महिलेस 6 लाख 50 हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रीराजु शंकर आहिरे (मखमलाबादरोड, विवेकानंद पंचवटी, मुळ रा. वाखारी पिंपळगाव, ता. देवळा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तक्रारदार महिलेच्या मुलास देवळाली कॅम्प येथील ''आरएमईएस या मिलिट्री इंजिनिअरींग या ठिकाणी नोकरीस लावतो'' असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला. यानंतर बंद पाकिट त्यांच्या पत्त्यावर पाठवून त्यात मुलाच्या नोकरीची ऑर्डर आहे. परंतु नाव चुकले आहे. पाकिट उघडू नये असे दुरध्वनीद्वारे सांगितले. यामुळे अधिक विश्वास निर्माण झाल्याने नोकरीपोटी जुन 2019 ते आतापर्यंत वेळोवेळी 6 लाख 50 हजार रूपये घेतले. 

वारंवार पैसे घेऊन देखील मुलास नोकरी न दिल्याने आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पंचवटी पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास उपनिरिक्षक एस. सी. कासर्ले करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT