crime news 1 accused arrested in case of rape of 42-year-old woman Kurlya mumbai esakal
नाशिक

Nashik Crime News : पार्टीसाठी मित्र आले घरी अन् झाली साडेपाच लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : घरात पार्टी करण्यासाठी आलेल्‍या मित्रांनीच तब्‍बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्‍याची फिर्याद महिलेने दिली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेताना रोख रक्‍कम व दागिने चोरल्याच्‍या संशयावरून तक्रारदार महिलेने तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. (Friend came home for party and five and half lakh stolen Nashik Latest Crime News)

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

योगिता घनशाम यशवंतराव (रा. वावरे नगर, तिडके कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.
गुरुवारी (ता.१) रात्री संशयित प्रियांका कैलास पवार (रा. पाइपलाइन रोड, गंगापूर रोड), तेजस रावसाहेब पगारे (रा. एबीबी सर्कल) आणि विशाल एकनाथ घन (रा. सावतानगर, सिडको) हे तिघे त्‍यांच्‍या घरी आले होते. घरात पार्टी सुरु असताना दोन वेळा योगिता या तेजससोबत बाहेर गेल्‍या. पहाटेपर्यंत पार्टी चालल्‍यानंतर शुक्रवारी (ता.२) संशयितांनी घर सोडले.

शनिवारी (ता.३) गळ्यातील सोन्याची चेन घालण्यासाठी कपाट उघडले असता योगिता यांना कपाट रिकामे असल्‍याचे आढळले. यासंदर्भात त्‍यांनी तिघा मित्रांकडे चौकशी केली असता, कोणीही माहिती दिली नाही. यानंतर त्‍यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत दागिने व रोकड चोरीचा संशय व्‍यक्‍त करताना तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.

वीस तोळे सोन्‍याचे दागिने

फिर्यादीत छोटे- मोठे चोवीस प्रकारचे व वीस तोळे वजनाचे दागिने चोरीस गेल्‍याचे म्‍हटले आहे. यामध्ये दोन लाख ७१ हजाराच्या सोनसाखळ्या, एक लाख १३ हजार ८२५ रुपये किमतीच्या ८ अंगठ्या, ३६ हजार रुपयांचे मूल्‍याची कर्णफुले, ७५ हजार रुपयांचे ब्रेसलेटसह अन्‍य दागिने आणि साठ हजार रुपयांची रोख रक्‍कम असा एकूण पाच लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्‍याचे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT